– कोरोना काळापासून अनुदानच बंद असल्याने ना वृत्तपत्र, ना नवीन पुस्तके, ना ग्रंथपाल मानधन – ग्रंथपाल सुशील खंडाळे
– वाचनालयासह वाचनालयाच्या अध्यक्षांना लागली घरघर
कोदामेंढी :- जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील वाचनालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त वाचना प्रेरणा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याचे वृत्तही दररोज विविध हिंदी व मराठी दैनिकांमध्ये प्रकाशित होत आहे. मात्र येथील श्रीकृष्ण वाचनालयातील कोरोना काळ अजूनही संपलेला नसून कोरोना काळापासून येथील अनुदान बंद असल्याने येथे ना वृत्तपत्र येत आहे ,ना नवीन पुस्तके ,ना ग्रंथपाल मानधन, असे येथील ग्रंथपाल सुशील खंडाळे यांनी सांगितले. त्यामुळे हे वाचनालय फक्त नामधारी असल्याने येथील वाचनालयासह वाचनालयाच्या अध्यक्षांना घरघर लागल्याचे वाचना प्रेरणा दिनी वाचनालयाला सकाळ व संध्याकाळी दोन वेळा आणि वाचनालयांच्या अध्यक्षांच्या घरी एकदा भेट दिल्यानंतर दिसून आले .
याबाबत सविस्तर वृत्त असे कि ,वार्ड क्रमांक चार मधील समाजभावनामध्ये स्थित असलेल्या लाईट ,पंखे, बसण्याची, आसन व्यवस्था, बाथरूम व शौचालयाची सोयीने सुसज्जित वाचनालयासह वाचनालयाची वेळ सकाळी आठ ते 11 सायंकाळी सहा ते नऊ असे वाचनालयाच्या भिंतीवर नमूद असून ,कोरोना काळापासून अनुदानच बंद असल्याने वाचनालय कोरोना काळापासून सकाळी पूर्ण बंद असते तर सायंकाळी मी अभ्यास करण्यासाठी सुरू करतो असे ग्रंथपाल सुशील खंडाळे यांनी सांगितले.
वार्ड क्रमांक एक मध्ये आठ महिन्यापूर्वी येथे राहणारे या वाचनालयाचे अध्यक्ष माजी उपसरपंच व यु .सी एन .केबलचे संचालक सुनील डोंगरे यांना तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या झटका आल्याने ते अत्यंत कर्जबाजारी झाले. त्यांनी विविध बँकेतून कर्जही घेतले होते .त्यातच 2022 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनलच्या सरपंच व दोन सदस्य तर विरोधी पॅनलचे नऊ सदस्य निवडून आले, परंतु ते हरले. त्यामुळे त्यांनी कर्ज परतफेड न केल्यामुळे बँकेने त्यांच्या घरावर सील लावले आहे. त्यामुळे ते 13/03/2024 ला गाव व गृह नागपूर जिल्हा सोडून भंडारा जिल्ह्यात भंडारा शहरात कुटुंबासह किरायाने राहायला गेले आहेत. त्यातच त्यांची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने ,त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे .पंधरा वर्षाची मुलगी व 13 वर्षाच्या मुलगा भंडारा सोडून पुन्हा गावात किरायाने राहत असलेल्या आजीकडे आल्याचे व पत्नी भंडाऱ्यावरून तिच्या नागपूर येथील प्रियकर सोबत पळून गेल्याचे व डोंगरे सध्या एकटेच राहत असून भंडारा येथील वरठी रोडवर टपरी लावून भजे व समोसे विकत असल्याचे वार्ड क्रमांक एक मधील अनेक नागरिकांनी व त्यांच्या संबंधित त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले .
2022 च्या निवडणुकीत येथील तालुक्यातील उत्कृष्ट रोजगार सेवक तथा पत्रकार किशोर साहू यांनी निवडणुकीचे नि:स्पक्ष व निर्भिड वृत्तांकन केल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाच्या समर्थनार्थ वृत्तांकन केल्याने सुनील डोंगरे हरले व त्यांच्या पॅनलला बहुमत मिळाले नसल्याचे ठपका ठेवत 13/03/2023 ला झालेल्या पाचशे लोकांच्या वर गर्दी जमलेल्या ऐतिहासिक ग्रामसभेत येथील ग्राम रोजगार सेवकाला काढण्यासाठी रोजगार सेवक किशोर साहू यांना ग्रामसभेत स्पष्टीकरणासाठी बोलावून साहू यांचे स्पष्टीकरण पूर्ण ऐकून न घेता स्वतः सरपंच मधातच उभे राहून स्वतःच्या समर्थक त्यांचे मोठे वडील रामदास बावनकुळे, सुनील डोंगरे त्यांचे कार्यकर्ते शुभम वैरागडे ,गोलू (महेंद्र) बावनकुळे, प्रणिता प्रकाश मेश्राम ,ग्रामपंचायत सदस्य खुशाल शिवणकर सह इतर नऊ कार्यकर्ते ग्रामसभेत मारण्यासाठी आणलेला दंडा घेऊन साहू यांच्यावर धावून पडले .त्यांच्या रेकॉर्ड केलेला व्हिडिओही तत्कालीन ठाणेदार राजेश जोशी व कामठी येथील व रामटेकचे प्रभारी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी मुखतार बागवान यांना दाखवूनही ,पारदर्शक सखोल चौकशी न करता ,फिर्यादी किशोर साहू यांनी सांगितलेल्या 14 आरोपींपैकी फक्त तीन आरोपींची नावे लिहून ,एन .सी. देऊन त्यांनाच आरोपी केले व 14 पैकी एक आरोपीने साहू यांच्यावर लावलेल्या जातीवाचक शिवीगाळ केल्याचे खोट आरोपाच्या व उरलेला तेरा आरोपीच्या खोट्या साक्षीने ॲट्रॉसिटी ॲक्ट लावून पंधरा दिवस तुरंग ठेवले होते. तर सरपंचाने ग्रामसभा पूर्ण होऊ न देता, बहुमत साहू यांच्याकडे असतानाही, बहुमत न तपासता हुकूमशाही पद्धतीने रोजगार सेवक साहू यांना पदावरून काढून टाकले. आजही साहू यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत लावलेली केस नागपूर येथील सेशन कोर्टात सुरू आहे. तर साहू हे बीएससी ,बीएड उच्चशिक्षित असल्याने गावात साहू स्टडी सेंटर च्या नावाने खाजगी ट्युशन क्लासेस घेत आहेत व त्यांची पत्रकारीताही सुरू असून सुख समाधानाचे जीवन जगत आहे.
तर हुकूमशाही पद्धतीने कारभार करणारे सरपंच आशिष बावनकुळे तीन लाख 88 हजार 474 रुपयाच्या पथदिप घोटाळ्यात अडकले असून मंत्रालयाच्या पंचायत राज सचिवांकडून त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. त्यामुळे नियती डोंगरे व बावनकुळे या दोघांना साहू यांच्यावर केलेल्या अन्याय व अत्याचारामुळे सजा देत असल्याची चर्चा वार्ड नंबर एक सह संपूर्ण गावात सुरू असल्याचे वार्ड नंबर एकचे रहिवासी तेली समाजाचे अध्यक्ष केशव बावनकुळे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नरेगातील बहुसंख्य मजूर वर्ग सांगत आहेत.