जी 20 शिक्षण कार्य गटाच्या परदेशी पाहुण्यांनी पुण्यामध्ये वारसा स्थळांना दिली भेट

मुंबई :- पुण्यात सुरू झालेल्या जी20 शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी सकाळी उपस्थित परदेशी प्रतिनिधींनी पुण्यातील वारसा स्थळांच्या भेटीचा अनुभव घेतला.

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर ढोल लेझीमच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्थानिक लोककलांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. शनिवारवाड्याची संपूर्ण माहिती यावेळी पाहुण्यांनी जाणून घेतली.

शनिवारवाड्यानंतर परदेशी पाहुण्यांनी लाल महाल आणि नाना वाड्याची पाहणी केली. लाल महालाशी संबंधित छत्रपती शिवरायांचा बालपणीचा इतिहास परदेशी पाहुण्यांनी आस्थेने जाणून घेतला. ऐतिहासिक नाना वाड्याचे महत्व देखील त्यांना समजावून सांगण्यात आले.

पुण्याच्या विविध शाळांमधील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसीचे छात्र यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणेकरांनीसुद्धा या पाहुण्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुणेकरांचे हे आदरातिथ्य पाहून परदेशी प्रतिनिधी भारावून गेले.

50 देशातील सुमारे 150 परदेशी पाहुणे या वारसा स्थळांच्या सफरीत सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रभाग २६ मध्ये मोदी@9 जनसंपर्क अभियान

Tue Jun 20 , 2023
नागपूर :- पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील विविध भागांमध्ये मंगळवारी (ता.२०) मोदी@9 जनसंपर्क अभियान राबविण्यात आला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर मोदी@9 हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी पूर्व नागपुरातील प्रभाग २६ मधील विश्वशांती नगर, माँ वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, गोकलानी लेआउट या परिसरामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com