विद्यापीठात लागले पक्षांसाठी… घरटे अन् जलपात्र

-पदार्थ विज्ञान विभागातील रासेयोचा उपक्रम

नागपूर :-उन्हाळ्यात पक्षांची तृष्णा भागावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात त्यांच्याकरिता घरटे अन जलपात्र लावण्यात आले आहे. विद्यापीठ पदार्थ विज्ञान विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची सुरुवात वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीश पालीवाल यांच्या हस्ते घरटे व जलपात्र बांधून बुधवार, दिनांक २९ मार्च २०२३ रोजी करण्यात आली.

यावेळी वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीश पालीवाल यांच्यासह पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ. ओ.पी. चिमणकर, डॉ. प्रकाश ईटणकर, डॉ. उमेश पलीकुंडवार, डॉ. अभय देशमुख, पदार्थ विज्ञान रासेयो समन्वयक डॉ. संजय ढोबळे आदी उपस्थित होते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर तीव्र उन्हामुळे पशु- पक्षांना पाण्याचा शोध घेत इतरत्र भटकावे लागते. उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे तसेच उन्हाच्या तीव्र झळा यापासून बचाव व्हावा म्हणून जलपात्र व घरटी बांधण्यात आली. पदार्थ विज्ञान विभागाच्या परिसरात असलेल्या झाडांवर पक्षांकरीता ही घरटी तसेच जलपात्र बांधण्यात आले. विभागातील एमएससी अभ्यास अभ्यासक्रमाच्या कार्तिक नागपुरे, फैजल खान, संकेत हेलोंडे, राहुल टिकले, आवेश शेख, निशा सोनकुसरे, ऋतुराज इंगळे, पारुल चाफेकर, श्रावणी धरणे, मृणाल गांडोळे, स्नेहल वर्गणे, आकांक्षा पूरम, प्रतीककुमार येळे, मृणाली बोपचे, सृष्टी मोवाडे, प्रणाली कमटवार, सुचिता चट्टे, वैष्णवी शर्मा, निकिता राऊत, रोशनी नांदेकर, रश्मी बल्की, सोनाली दुपारे, सुयेशा चव्हाण, दिप्ती सिंह, द्रौपदी गिंगुले, प्रांजली पारधी, आरती यादव, राहुल थमाट्टूर, रोशनी कटरे, प्रियांशी पालीवाल, प्रिथा शेनाड, अंकित तळवेकर, आचल बोंद्रे, जुतेश लिखार यांच्यासह अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर विद्यापीठात सम्राट अशोक जयंती साजरी

Thu Mar 30 , 2023
सम्राट अशोक धर्मनिरपेक्ष होते : डॉ नीरज बोधी  नागपूर :- बुद्धीझमचा खऱ्या अर्थाने व्यावहारिक पैलू ज्यात समता, मानवता, उदारता अशी सर्व समावेशकता आहे. बुद्धिझमचा सेक्युलर पैलू सम्राट अशोकाने खऱ्या अर्थाने जगापुढे आणून भारतीय संस्कृतीचे तत्व रुजविले असे मत नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ निरज बोधी यांनी व्यक्त केले. ते पाली व बौद्ध अध्ययन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com