नागपूर विद्यापीठात सम्राट अशोक जयंती साजरी

सम्राट अशोक धर्मनिरपेक्ष होते : डॉ नीरज बोधी 

नागपूर :- बुद्धीझमचा खऱ्या अर्थाने व्यावहारिक पैलू ज्यात समता, मानवता, उदारता अशी सर्व समावेशकता आहे. बुद्धिझमचा सेक्युलर पैलू सम्राट अशोकाने खऱ्या अर्थाने जगापुढे आणून भारतीय संस्कृतीचे तत्व रुजविले असे मत नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ निरज बोधी यांनी व्यक्त केले.

ते पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे आयोजित प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या 2327 व्या जयंती निमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

जयंती समारोहाच्या अध्यक्षस्थानी पाली विभागाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ तुलसा डोंगरे ह्या होत्या. डॉ डोंगरे ह्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सम्राट अशोकाने स्वतःचा मुलगा महिंद्र व मुलगी संघमित्रा ह्या दोघांनाही धम्माला दान देऊन बौद्ध तत्त्वज्ञानातील दान पारमितेचा उच्चांक गाठला. एवढेच नव्हे तर विनयाचे पालन न करणाऱ्या 60 हजार बौद्ध भिक्षूंचे चीवरही उतरविले असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी प्रा डॉ सुजित वनकर, प्रा डॉ ज्वाला डोहाणे, सिद्धार्थ फोपरे, अलका जारुंडे, ऍड अवधूत मानवटकर, सुभाष बोंदाडे, दिशा वानखेडे आदींनी सम्राट अशोकाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पालीचे अभ्यासक उत्तम शेवडे यांनी तर समापन डॉ वासूदेव बारसागडे यांनी केला.

कार्यक्रमाला पाली पदव्युत्तर व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com