कामठीत तालुक्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा वर्धापन दिन कामठी तालुक्यात ठिकठिकानी साजरा करण्यात आला यानुसार कामठी तहसील कार्यालयात 1 मे ला सकाळी 8 वाजता तहसिलदार गणेश जगदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .याप्रसंगी ,नायब तहसीलदार राजाराम बमनोटे, ,नायब तहसीलदार अमर हांडा,नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर,नायब तहसिलदार उपेश अंबादे,नायब तहसिलदार मयूर चौधरी,निरक्षण अधीकारी बाळाजी घावस माजी आमदार देवराव रडके,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापूरे, बीडीओ प्रदीप गायगोले, गटशिक्षणअधिकारी संगीता तभाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते दरम्यांन पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी सलामी दिली .

यावेळी माजी नगराध्यक्ष रतनलाल बरबटे,,उज्वल रायबोले, यासह गणमान्य नागरिक व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच सकाळी 9 वाजता नगर परिषद प्रांगणात मुख्याधिकारी व प्रशासक संदीप बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कामठी पंचायत समिती प्रांगणात बीडीओ प्रदीप गायगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना धुपारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आय लव्ह कामठी गेले चोरीला

Thu May 2 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उनगर मानले जाणारे कामठी शहराची जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे जगाच्या नकाशात नोंद करण्यात आली आहे.तसेच येथील सैन्य केंद्रामुळे कामठी शहराचे महत्व मोठे आहे तर कामठी शहराची ओळख ही आणखी सर्वदूर व्हावी या हेतूने कामठी नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील मध्य भाग असलेल्या जयस्तंभ चौकात ‘I LOVE KAMPTEE”चे स्ट्रेचर लावून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com