कोदामेंढी :- 20 नोव्हेंबर बुधवार ला विधानसभेचे निवडणूक पार पडले. मात्र 20 नोव्हेंबरला सकाळी साडेसातच्या दरम्यान निमखेडा ते वीरसी मार्गाने सदर वार्ताहर व त्यांचे सहकारी वृत्तपत्र एजंट पैलेश मेश्राम विविध हिंदी ,मराठी इंग्रजी ,दैनिक, साप्ताहिक ,मासिक वृत्तपत्र चार चाकीने वाटत येत असताना, त्यांना मजूर वर्ग धानाच्या बांदयाजवळील याच रस्त्यावर हातात विळे घेऊन दिसले असता, त्यांना त्यांनी मतदान केले का? असे विचारले असता, त्यांनी सांगितले की आमचे मतदान भंडारा जिल्ह्यात असून आम्ही व आमच्यासारखे मजुरांचे समूह मौदा तालुक्यातील गावा गावात तात्पुरते राहत असून तेथील शेतकऱ्यांचे धान कापणी करत आहोत. दुपारला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गाडी आम्हाला मतदानासाठी न्यायला येणार आहे .त्यामुळे आम्ही दुपारला भंडाऱ्याला जाऊन मतदान करणार आहोत व मतदान करून झाल्यावर रात्रीला पुन्हा परत इथेच येणार आहोत.जर मतदानाला सकाळीच गेलो तर आमची रोजी पडेल, त्यामुळे आम्ही आमचे काम आधी उरकून घेतो त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्य मतदान करूच, काही मजुरांनी म्हटले की आधी पोटोबा नंतर वोटोबा व एकच हास्यकल्लोळ उडाला!, साहेब उद्या सकाळी आमच्या हाताला मतदान केल्याच्या पुरावा म्हणून निळी साई नक्कीच दिसेल असे धान कापणी करण्यासाठी धानाच्या बांधीत उतरताना त्यांनी आवर्जून सांगितले.
मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंदा निवडणूक विभागाने विविध युक्त्या अवलंबिल्या. मतदान जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया, शासनाचे सर्व विभागात मतदान जागृती करण्यासाठी प्रभात फेरी , मतदानाची शपथ व आधी मतदान नंतर काम असे घोषवाक्य ही सोशल मीडियावर गाजविले. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांनी स्वतःचे घोषवाक्य तयार केले असून सकाळी काम ,दुपारी मतदान व या घोषवाक्यनुसारच लापका येतील मजूर वर्गांनी मतदान केल्याचे आज 21 नोव्हेंबर गुरुवारला सकाळी साडेसहा दरम्यान मौदा ते लापका मार्गाने येताना मजुरांनी सांगितले. तर भंडारा जिल्ह्यातील निमखेडा ते वीरसी मार्गावर धान कापणी करणारया मजूर वर्गांनी हातावरची निळीशाही दाखवून मतदान केल्याचे सांगितले. सकाळी काम व दुपारी मतदान करूनही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता येते हे मजुरांकडून शिकण्यासारखा आहे. शासनाने तर सर्व शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी पगारी सुट्टी जाहीर केली होती, हे विशेष!