नागपूर :- राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. अशातचं आता राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांनी चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमधून संजय शंकर कन्नवार यांच्यांसह 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.रासपची पहिली यादीत नागपुर जिला कामठीतून नफीस शेख “एल्गार” यांना उमेदवारी घोषित झाली आहे।
आज जाहीर आलेल्या यादीत मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जागांचा समावेश आहे. महादेव जानकरांचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरला असून उर्वरित उमेदवारांची यादी आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महादेव जानकरांचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरला असून उर्वरित उमेदवारांची यादी आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गंगाखेड – आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, अहमदपूर – आ. बब्रुवान खंदाडे, भोकर – साहेबराव बाबा गोरटकर, कळंब धाराशिव – श्रीहरी वसंत माळी, परांडा – डॉ. राहुल भीमराव घुले, परभणी – सावित्री सतीश महामुनी चकोर, मुखेड – विजयकुमार भगवानराव पेठकर, हदगाव हिमायतनगर अॅड. संतोष उत्तमराव टीकोरे, नायगाव – हनुमंतराव मारोतराव वनाळेकर, बारामती- संदीप मारुती चोपडे, अक्कलकोट – सुनील शिवाजी बंडगर, राहुरी – नानासाहेब पंढरीनाथ जुधारे, अंबरनाथ – रुपेश थोरात, निलंगा – नागनाथ बोडके, इंदापूर – तानाजी उत्तम शिंगाडे, देगलूर – श्याम बाबुराव निलंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
पैठण – प्रकाश उत्तमराव दिलवाले, वैजापूर गंगापूर – बाबासाहेब कचरू राशिनकर, कराड उत्तर – सोमनाथ रमेश चव्हाण, पुरंदर – संजय शहाजी निगडे, भोर – रामचंद्र भगवान जानकर, खानापूर आटपाडी- उमाजी मोहन चव्हाण, कोल्हापूर दक्षिण – विशाल केरू सरगर, पन्हाळा शाहूवाडी – अभिषेक सुरेश पाटील, इचलकरंजी- प्रा. सचिन किरण बेलेकर, सातारा – शिवाजी भगवान माने, आंबेगाव – योगेश पांडुरंग धरम, कोथरूड – सोनाली उमेश ससाणे, कसबा पेठ – शैलेश रमेश काची, वडगाव शेरी – सतीश इंद्रजीत पाण्डेय, मागाठाणे – जिवाजी लेंगरे, जोगेश्वरी पूर्व – विजय पतिराम यादव, कांदिवली – ओमप्रकाश सोनार, दिडोशी – राकेश लालमनी यादव, नालासोपारा – नरसिंह रमेश आदावळे, वसई – हरिशंकर शेषनारायण जयस्वाल, सांगोला – सोमा उर्फ आबा गुलाब मोटे, वर्सोवा – मेहक चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.