फटाके फोडण्याची वेळ सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत

– उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मनपातर्फे दिशानिर्देश जारी : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाचा निर्णय

नागपूर :- दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी आता कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजताची वेळ निर्धारित केली आहे. मा. मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशान्वये वायू गुणवत्ता संचालन विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी मंगळवारी (ता.७) दिशानिर्देश जारी केले. तसेच संबंधित विभागांना याबद्दल आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

नागपूर शहरातील वायू प्रदूषण वाढत असून ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी याबाबत निरंतर कार्यवाही गरजेची असून त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने पाउल टाकले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली असून या वेळांच्या योग्य पालनाबाबत कार्यवाहीच्या दृष्टीने मनपासह नागपूर पोलिस विभागाला देखील मा. उच्च न्यायालयातर्फे सूचना देण्यात आली आहे. याशिवाय शहरामधील बांधकांम स्थळांबाबतही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. इमारत बांधकाम स्थळावरील धुळ उडू नये व ते धुळीकण हवेत मिसळू नये यासाठी बांधकाम स्थळी लोखंडी पत्रे लावावेत तसेच सतत पाण्याची फवारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास यांचेद्वारे शहरात कार्य सुरू असलेल्या सर्व ठिकाणी देखील नियमित पाण्याची फवारणी करण्याची आवश्यक दिशानिर्देशामध्ये नमूद करण्यात आली आहे.

बांधकाम स्थळांवर वा अन्य ठिकाणी जमा असलेल्या सी अँड डी कच-याचे धुलीकण हवेत मिसळू नयेत यासाठी हा कचरा पूर्णपणे झाकलेला असावा, याशिवाय बांधकाम मलबा ट्रकमधून डम्पिंग यार्डमध्ये घेउन जाताना तो देखील पूर्णपणे झाकलेला असावा तसेच रेडी मिक्स क्राँक्रिट तसेच बांधकाम साहित्य देखील झाकूनच आणले व नेले जावे, अशी देखील सूचना करण्यात आलेली आहे. शहरात कुठेही कचरा जाळण्यास बंदी आहे. कचरा जाळणा-यांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेही कचरा जाळला जाउ नये, याबाबत देखील निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ ताफ्यातील सर्व बसेस आणि सर्व शासकीय वाहनांचे पीयूसी तपासण्याचे देखील मनपा परिवहन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. दिवाळीमध्ये फटाके फोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणावर पडणारा विपरित परिणाम यासंबंधी शहरातील सर्व शाळांमधून जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी मनपा शिक्षण विभागाला कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुणबी नोंदी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षात नोंदी तपासणे सुरू

Wed Nov 8 , 2023
– शासन निर्णयानुसार नोंदी तपासून सादर करा जिल्हाधिकारी भंडारा :- कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यात कुणबी नोंदी असलेले अभिलेख तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काल जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सर्व संबधित यंत्रणांची आढावा बैठक घेतली.त्यामधे उपलब्ध अभिलेख तपासून त्यातील कुणबी नोंदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com