पो.स्टे. काटोल :- अंतर्गत ७३ कि. मी. अंतरावरील राठी लेआउट काटोल येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे २०. ३० वा. ते २२.५० वा. दरम्यान फिर्यादी नामे देवेन्द्र नामदेव साठोने, रा. मरामाय नगर रोड राठी लेआउट काटोल है घराशेजारी नातेवाइकांकडे गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने फिर्यादीचे घराचे कुलूप तोडून नगदी पैसे व चांदीचे दागिने असा एकुण ५००० /- रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. काटोल येथे आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि देश ९६६५६१५२९५ हे करीत आहे.