पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी

नागपूर :- नागपूर दौऱ्यावर आलेल्या अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक संपल्यानंतर मंत्री सत्तार यांनी निर्मल अर्बन बँकेला सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी हिंगणा नजीकच्या बाबासाहेब केदार शेतकरी सहकारी सूतगिरणीला भेट देत पाहणी केली. यावेळी माजी मंत्री तथा गिरणीचे उपाध्यक्ष रमेशचंद्र बंग यांनी सत्तार यांचा सत्कार केला. त्यांनतर त्यांनी कोंढाळी जवळच्या निर्मल टेक्सटाईल पार्कला भेट देत पाहणी केली.

कापसाचा प्रदेश अशी विदर्भाची ओळख आहे. नागपूर जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया करीत विविध उत्पादनांची निर्मिती होत असून या माध्यमातून रोजगार निर्मिती होत आहे. कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री सत्तार पाहणीदरम्यान म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बार्टीच्या बुक स्टॉलवर पुस्तके खरेदीसाठी उसळला भीमसागर

Fri Oct 27 , 2023
– 85 टक्के सवलतीच्या दरातील उपक्रमाचा देशभरातील अनुयायांनी घेतला लाभ नागपूर :- बार्टी संस्थेच्यावतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषाच्या सामाजिक समता प्रस्थापित करणारे पुस्तके, डॉ. बाबासाहेब यांचे खंड, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका अल्प दरात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. 85 टक्के सवलतीच्या दरात पुस्तक मिळवण्यासाठी बार्टीच्या बुक स्टॉलवर भिमसागर उसळला होता. बार्टी संस्थेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com