किरनापुर येथे मंडई उत्सव खडा तमाशा रंगला, शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- रामटेक तहसील अंतर्गत किरनापुर, काचुरवाही येथे ग्रामवासी तर्फे दिवाळीच्या शुभपर्वावर नुकतेच मंडई उत्सव निमित्त येथे खडा तमाशा ज्येष्ठ शाहीर माणिकराव देशमुख यांची खडी गम्मत द्वारे लोककलेतुन समाज प्रबोधन करण्यात आले . यावेळी भारतीय कलाकार शाहिर मंडळचे केंद्रीय अध्यक्ष आकाशवाणी,कॅसेट सिंगर शाहीर राजेंन्द्र बावनकुळे चे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मुर्तीचीन्ह देवून सत्कार करण्यात आला.यावेळी शाहीर अरुण मेश्राम,शा .प्रदीप कडबे, शा.रमेश रामटेके यांचे पण सत्कार करण्यात आले.यावेळी किरनापुर सरपंच कृष्णा उईके , ग्रा.सदस्य सुरेश कुथे, रवींद्र नांवटकर,स्वप्निल हुळ, लहानु ढवळे,दिलीप देवगडे,राहुल देशपांडे, किरनापुर गावातील नागरिकांनी व नवयुवक मंडई उत्सव समिती यांनी खडा तमाशाचा गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाचे आनंद घेतला .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com