– दोन महीण्यापुर्वी न्यु तोतलाडोह परीसरात घडली होती घटना
– दृष्यम चित्रपट पाहुन गुन्हा केल्याची दिली आरोपीने कबुली.
रामटेक :- दि. ३ ऑगस्ट ला न्यु तोतलाडोह परीसरात अज्ञात आरोपीकडुन शैलेश भरतराम शिवनकर या डेली कलेक्शन करणाऱ्या इसमाला मारहान करून त्याच्याजवळील कलेक्शन चे पैसे व टॅब घेऊन पसार होण्याची घटना घडली होती. तेव्हा फिर्यादीने तक्रार दिल्यावर त्याचा छडा लावणे हे देवलापार पोलिसांना मोठे आव्हान होते. मात्र तपासाची गती वाढवत अवघ्या दोन महिन्यातच या घटनेचा छडा लावत देवलापार पोलिसांनी आरोपीला नागपूर इथून अटक केली.
शैलेश भरतराम शिवणकर असे फिर्यादी चे नाव असुन तो भारत फायनान्स मध्ये डेली कलेक्शनचे काम करीत होता. त्याची दुचाकी क्रमांक एम एच 35 एके 8896 या वाहनाने शिंदेवाही देवलापार परिसरात कलेक्शन करणे करिता गेला होता. दरम्यान न्यु तोतलाडोह कडुन हायवेकडे जात असताना कच्च्या डांबरी रोडवर एक अनोळखी इसम हातात दंडा घेऊन अचानक जंगलातून आला व त्याने फिर्यादीच्या डोक्यावर दंडाने वार करून त्याचे जवळील बॅग घेऊन जंगलात पळून गेला. त्या बॅगमध्ये फिर्यादीने फायनान्स चे कलेक्शन केलेले दोन लाख ते अडीच लाख रुपये व सॅमसंग कंपनीचा टॅब किंमत पाच हजार रुपये असा मुद्देमाल होता. आरोपीने हा मुद्देमाल जबरीने चोरून घेऊन पळून गेला असल्याचे फिर्यादीने बयान देतांना देवलापार पोलिसांना सांगीतले. या वरून सदरच्या गुन्हा पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 155 / 22 कलम 394 भांदवी नोंद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी तपासात घेतला होता. सदर गुन्हा उकल करण्याकरीता ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड ना.पो.शी संदीप नागोसे, शिवचरण नागपुरे , पोलीस शिपाई सचिन डायलकर यांचे पथक तयार करून तपास सुरु करण्यात आला. तपास करीत असताना सदर गुन्ह्यात अनेक लोकांना पडताळले परंतु गुन्ह्याची उकल होत नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध लागणे कठीण होत चालले होते. यातच सदर पथकाने संशयित आरोपी नामे नितीन उर्फ कालु सरोते हा घटनेच्या दिवशी सदर ठिकाणी आला होता त्यास विचारपूस केली असता सदर आरोपीने त्या दिवशी मोबाईल न वापरता इथे आला व तो त्या दिवशी तो कुठे कुठे होता याबद्दल संपूर्ण माहिती देत पोलिसांना असे भासवले की जणू ‘ तो मी नव्हेच ‘ परंतु पोलिसांना त्याच्यावर संशय होता पण कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे पोलिसांना त्याला नाईलाजाने सोडावे लागले. पुन्हा देवलापार पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करून माहिती काढली असता सदर आरोपीने गहान ठेवलेली दुचाकी मोठी रक्कम देऊन सोडविली असल्याची माहिती देवलापार पोलीसांना मिळाली तेव्हा पोलिसांना संशय बळावला. यातील विधी संघर्ष ग्रस्त बालकाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबूली दिली व त्याने सांगितले नितीन हाच सूत्रधार आहे तेव्हा वेळ न घालवता पोलीस उपनिरीक्षक पुंजरवाड हे आपले पथक घेऊन नागपूर येथे रवाना झाले परंतु आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्यास पकडणे कठीण होते तेव्हा पोलीस उपनिरीक्षक यांनी बांधकाम व्यावसायिकाला संपर्क साधून त्याचा पत्ता काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दोन ते तीन दिवसांनी आपली रूम बदलणार आहे असे त्यास माहिती पडले अखेर न्यू मनीष नगर येथील बिल्डिंगमध्ये पेंटिंग करताना तो मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक कुंजरवाड यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता आरोपीने दृश्यम चित्रपट पाहून हे कृत्य केल्याचे सांगितले आरोपीला अटक करून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले व पुढील तपास सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, नाकोशी संदीप नागोसे, शिवा नागपुरे पोलीस शिपाई सचिन डायलकर, संतोष बाट यांनी केली. पुढील तपास ठाणेदार बोरकुटे हे करीत आहे.