15 ऑक्टोबर भारतीय वृत्तपत्र वितरण दिवस जाहीर करा–दिपंकर गणवीर..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 13 :- 15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस .हा दिवस सरकारकडून वाचन प्रेरणा दिवस म्हणूनही साजरा केला जातो,डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड होती याशिवाय त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र वितरणातून केली त्यामुळे हा दिवस भारतीय वृत्तपत्र वितरण दिवस जाहीर करावा अशी मागणी समस्त वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने कामठी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष, नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी दिपंकर गणवीर यांनी केले आहे.

यासोबतच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रफुल लूटे, किशोर खेडकर,सुरेश अढाऊ आदींनी सुदधा मागणी केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com