काटोल :- काटोल नगर परिषद क्षेत्रातील मारामाय नगर व अर्जुन नगर मधील रेल्वे लाईनच्या दोन्हीं बाजूला असलेल्या रहिवासी नागरिकांना रेल्वे सीमारेषेच्या आत असल्याचे कारणांस्तव 10 दिवसाचे आत घरे खाली करण्याकरिता नोटीस बजावण्यात आल्या होत्या,नागरिकांनी नागपूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
चरणसिंग ठाकूर यांनी विलंब न लावता 30.11.2022 ला मंडल प्रबंधक मध्य रेल्वे नागपूर यांना पत्र लिहून भेट घेतली असता वरिष्ठ मंडल अभियंता मध्य रेल्वे नागपूर यांच्यासोबत बैठक घेऊन कागदपत्रांद्वारे दोन्ही नगरातील रहिवासी यांची घरे अतिक्रमनात येत नसल्याचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर याांना चरणसिंग ठाकूर यांनी लक्षात आणून दिले.
रेल्वे वरिष्ठ अभियंता प्रथम अग्रवाल यांनी मान्य करून तडकाफडकी निर्णय घेऊन ३७ नगरीकांच्या अतिक्रमणं नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेऊन त्याच तारखेला सहाय्यक मंडल अभियंता यांना पत्राद्वारे कळविले असून उर्वरित नागरिक,न प प्रशासन यांचेसोबत त्याच जागेवर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाने चरणसिंग ठाकूर यांना आश्वासन दिले बैठकीला भाजपा अनु जाती जमाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री देविदास कठाने, कृ ऊ बा समिती,संचालक किशोर गाढवे, माजी नियोजन सभापती राजू चरडे उपस्थित होते.
चरणसिंग ठाकूर यांनी आज दिनांक 1 डीसेबर 2022 ला काटोल येथील कार्यालयात मारामआय व अर्जुंनगर येथील नागरिकांसोबत बैठक घेऊन रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण नोटीस मागे घेतल्याचे पत्र सुपूर्त करून आपले घरे कोणीही पाडणार नाहीत असा विश्वास चरणसिंग ठाकूर यांनी दिला
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, कृ ऊ बा संचालक,दिनेश ठाकरे,शहर अध्यक्ष विजय महाजन,महामंत्री कोमल देशमुख,माजी नगराध्यक्ष, भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष,माजी नगराध्यक्षा वैशाली दि ठाकूर , जेष्ठ नागरिक अशोक काळे,प्रकाश देशभ्रतार उपस्थित होते