आशा स्वयंसेविका द्वारे ताप रुग्ण सर्वेक्षणाला सुरुवात

– डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग अलर्ट

नागपूर :- नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. शहरातील तापरुग्णांच्या सर्वेक्षणाला आरोग्य विभागाद्वारे सुरूवात करण्यात आलेली आहे. झोननिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे हे सर्वे करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

सातत्याने वाढणाऱ्या पावसामुळे किटकजन्य आजारात वाढ होत आहे. अशा आजार असलेल्या ठिकाणी वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविकांद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन तापरुग्णांची माहिती घेतील. याशिवाय कंटेनर सर्वे अंतर्गत घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जाईल. दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्याबाबत देखील आशा स्वयंसेविका समूपदेशन करणार आहेत. १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. एक महिन्यात सर्वेक्षणाच्या तीन फेऱ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविकांद्वारे दररोज ५० ते ७५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

गुरूवारी (ता.०१) मंगळवारी झोन अंतर्गत जरीपटका परिसरात घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले. झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान यांच्या नेतृत्वात आशा स्वयंसेविकांनी सर्वेक्षणात ताप रुग्णांची माहिती, कंटेनर सर्वे केले. लारवा आढळलेल्या ठिकाणी औषध टाकण्यात आले.

सर्वेक्षणाचे योग्य नियोजन आणि पर्यवेक्षणाकरिता झोनस्तरीय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर हे सर्वेक्षणाचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षीय अधिकारी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या झोनमधील कार्यावर देखरेख ठेवतील. पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनची जबाबदारी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांचेकडे, हनुमान नगर व धंतोली झोनची जबाबदारी साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांचेकडे, नेहरूनगर व गांधीबाग झोनची जबाबदारी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांचेकडे, सतरंजीपुरा व लकडगंज झोनची जबाबदारी प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांचेकडे, आशीनगर झोनची जबाबदारी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांचेकडे आणि मंगळवारी झोनची जबाबदारी हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांचेकडे सोपविण्यात आली आहे. झोनल वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षीय अधिकारी यांचेकडे सर्वेक्षणाचा अहवाल सादर करतील व तो अहवाल पर्यवेक्षीय अधिकारी मुख्यालयात वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचेकडे सादर करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करा : सल्लागार समिती

Fri Aug 2 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी तथा सामुचित प्राधिकारी पीसीपीएनडीटी डॉ. दिपक सेलोकर यांच्या कक्षात सल्लागार समितीच्या नियमित सभेचे आयोजन (31 जुलै) करण्यात आले होते. सल्लागार समितीच्या सभेत सोनोग्राफी केंद्राचे नव्याने नोंदणी करीता एकुण 11 प्रकरण तसेच सोनोग्राफी केंद्राचे नुतनिकरणा करीता एकुण 11 प्रकरणे समिती समोर ठेवण्यात आले होते. सर्व अर्जाची तपासणी करुन सोनोग्राफी केंद्राच्या नविन नोंदणी तसेच नुतनिकरणास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com