एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ “शटल बस सेवेला” प्रारंभ

– मनपाच्या विद्युत वातानुकूलित बस सेवेमुळे नागरिकांना सोय

नागपूर :- नागपूर महानगरपालिका, महा मेट्रो आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन- विमानतळ- एयरपोर्ट मेट्रो स्टेशन या दरम्यानच्या “शटल बस सेवेला” शुक्रवार (ता. २) पासून प्रारंभ झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर येथे झालेल्या छोटेखानी समारंभात महामेट्रो संचालक अनिल कोकाटे, मनपाचे उपायुक्त सुरेश बगळे, मिहान इंडिया लिमिटेड विमानतळ संचालक मोहम्मद आबिद रुही, मेट्रोचे वरिष्ठ उप महाव्यवस्थापक महेश मोरोने, मेट्रोचे उप महाव्यवस्थापक एस जी राव, सुधाकर उराडे, मिहान इंडिया लिमिटेडचे कंपनी सेक्रेटरी, कुमार रंजन ठाकुर, सह महा व्यवस्थापक (विमानतळ) अमित कासटवार, मनपा परिवहन प्रशासकीय अधिकारी रविंद्र पागे, परिवहन व्यवस्थापक  योगेश लुंगे,  सचिन गाडबैल, बाजार अधिक्षक प्रमोद वानखेडे, मन यादव, डीम्सचे सूर्यकांत अंबाडेकर, महामेट्रोचे अखिलेश हळवे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या “शटल बस सेवेला” सुरुवात करण्यात आली, नंतर सर्वच मान्यवर आणि प्रवासी यांनी विमानतळ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन असा प्रवास केले. शटल बस सेवेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित ४५ आसन क्षमतेच्या दोन विद्युत वातानुकूलित बस (ई-एसी बस) प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ यादरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना केवळ १२ रुपये इतके तिकीट असणार आहे.

एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या या विद्युत वातानुकूलित शटल बसची सेवा सकाळी ६ ते रात्री १० वाजता पर्यंत असणार आहे. तसेच दर १५ मिनिटांनी बस उपलब्ध असल्याने प्रवाशांना सामानासह विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ असा प्रवास सुलभरीत्या करता येईल. शिवाय या सेवेमुळे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रवाश्यांची सोय होणार आहे. अधिकाधिक प्रवाशांनी या शटल बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाचे उपायुक्त सुरेश बगळे यांनी केले आहे.

*इंद्रकुमार खुरसाडे शटल बस सेवेचे प्रथम प्रवासी*

एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ सुरु झालेल्या शटल बस सेवेचा लाभ घेणारे चंद्रपूर निवासी इंद्रकुमार खुरसाडे हे प्रथम प्रवासी ठरले आहे. दिल्लीवरून नागपूरला आले असता त्यांनी सर्वप्रथम मनपाच्या विद्युत बसला प्राधान्य देत प्रवास केला. हा प्रवास सुखर आणि सुलभ असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या सेवेमुळे प्रवाशांना उत्तम सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय प्रवासी धीरज गुरबानी आणि प्रीतम चुटे यांनी देखील शटल सेवेसाठी प्रशासनाचे आभार मानले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गौवंश कोबुन भरून नेताना २ ट्रक पकडले, १ ट्रक पसार 

Sat Feb 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कन्हान पोलीसाची कारवाई, ५६ गौवंश ला जिवनदान देत ३७ लाख च्या वर मुद्देमाल जप्त.  कन्हान :- तारसा कडे जाणा-या तारसा रोडवरील नागपुर बॉयपास चारपदरी रोड उडाणपुला खालील सर्व्हीस रोड वर कन्हान पोलीसाना अवैधरित्या गौवंश जनावरांना कोबुन भरून वाहतुक करतांना तीन ट्रक पकडले. यातील दोन ट्रक व दोन ट्रक चालकाला ताब्यात घेतले तर एक ट्रक पसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com