” चंद्रपुर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनाबाबत ”  

चंद्रपूर  :- सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर शहरमहानगरपालिका कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. त्याचप्रमाणे जुन महीन्यातील लोकशाही दिन, सोमवार दि. ३ एप्रिल २०२३ रोजी महानगरपालिका कार्यालयात आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी ०१-०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत नमून्यातील दोन प्रतीत अर्ज सादर करावे.

अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत विभागाकडे निवेदन कार्यवाही करीता पाठविण्यात येईल. संबंधीत विभागप्रमुख अर्जदाराला आपल्या स्तरावर निवेदनासंबंधी केलेली कार्यवाही किंवा चालु असलेली कार्यवाही याबाबत अवगत करतील,तसे विभाग प्रमुखाकडून न झाल्यास किंवा अर्जदाराचे समाधान न झाल्यास अर्जदारांना लोकशाही दिनामध्ये आयुक्त यांचे कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करता येईल.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com