लोकसंख्येची अट रद्द : गावामध्ये एकाच वेळी कितीही विहिरींची कामे सुरू करणे शक्य
पारशिवनी :-पारशिवनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत सिंचन विहीरी बाबद. महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे .दोन विहिरीतील अंतराची अट शिथिल केली असून दुसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे तीन लाखांवरून चार लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे एका गावात कितीही विहीरी घेता येणार आहे.
ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा आणि सिंचन क्षेत्रातही वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत सिंचन विहिरीचे कामे केली जातात. भूजल सर्वेक्षणानुसार राज्यात अजून सुमारे ३लाख ८७ हजार ५०० विहीरी खोदणे शक्य आहे. राज्य सरकारने नव्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजन (नरेगा) अंतर्गत सिंचन विहीरी साठी अनुदान देताना नव्याने बरेच बदल केले आहेत. सिंचन विहिरीसाठी मानक आँपरेटिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे विहीरी साठी किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
एक पेक्षा अधिक लाभ धारकही विहिरीचा लाभ घेऊ शकतात. सार्वजनिक जलस्रोतांच्मा ५०० मिटर परिसरात मात्र नवीन विहीरी घेता येणार नाही. मात्र पूर्वी दोन विहिरीत किमान दीडसे मीटरच्या अंतराच्या अटी रद्द केली आहे. ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीची मंजुरी आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाच्या लेबर बजेटमध्ये समावेश करावा लागणार आहे. . विहीरी मंजूर झाल्यानंतर लाभ धारकांला तीन वर्षांत तिचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
यांना मिळणार लाभ
अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी स्त्री कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिक विकलांग व्यक्ती कर्ता असणारी कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी. ईदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती, सीमान्त शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
नवे बदल
दोन विहिरीतील दीडशे मीटरची अट रद्द लोकसंख्येनुसार विहीर उद्दिष्टाची अट रद्द एकाच वेळी गावात कितीही विहिरी घेता येणार.
अनुदान तीनवरून चार लाख रुपये, कुशल काम करू शकत नसल्यास संमती द्यावी, हार्ड स्टेट्स लागल्यास मशीन, कास्टिंगचा वापर, अर्जातही सोपे बदल केले आहेत.
विहिरीचा लाभ या शेतकऱ्यांना सुध्दा व्हायला हवा – माया इंद्रपाल गोरले सरपंच ग्रामपंचायत आमगाव (बाबुळवाडा) पंचायत समिती पारशिवनी पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाच्या सिंचन योजना अंतर्गत आमगाव, बाबुळवाडा गावातील कमाड क्षेत्रात कृनल आहे. पण शेतीला पाणी पुरवठा होत नाही. मात्र ७/१२ वर कॅनल असल्याची नोंद आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकरी बांधवांना नरेगा योजनेच्या माध्यमातून विहिरीचा लाभ मिळत नाही. तरी ७/१२ वरून कॅनल असल्याची नोंद रद्द करावी किंवा सिंचन करण्यासाठी कॅनल चे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. नाहीतर ७/१२ वरून कॅनल असल्याची नोंद रद्द करण्यात यावी. जेणेकरून शेतकरी बांधवांना शेतीला सिंचनासाठी नरेगा अंतर्गत विहिरीचा लाभ घेता येईल. पण आजपर्यंत या शेतकऱ्यांच्या शेतात कॅनल चे एक थेंब ही पाणी सिंचन करण्यासाठी मिळाले नसल्याने येथील शेतकरी बांधवांचे सिंचनाचे स्वप्न हे क्षणभंगुर ठरले आहे. असे माया इंन्दपाल गोरले सरपंच ग्रामपंचायत आमगाव, बाबुळवाडा पंचायत समिती पारशिवनी यांनी पत्रकाराशी चर्चे दरम्यान सांगितले.