पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करा, व्हॉईस ऑफ मीडियाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.

– ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.

– मुख्यमंत्री यांनी केले ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कामाचे कौतुक.

मुंबई :- पत्रकारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

महाराष्ट्रातील ८५ टक्के पत्रकारांचे वेतन २० हजारांपेक्षा कमी आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठी पत्रकारांना जोड व्यवसाय करणे आवश्यक आहे. परंतु जोड व्यवसाय करायचा असल्यास बँकांकडुन कर्जपुरवठा केला जात नाही. त्यामुळे राज्यातील पत्रकार बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देत आहेत. महाराष्ट्रात विविध घटकांसाठी कल्याणकारी महामंडळ आहेत. जसे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याच धर्तीवर पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अनिल हस्के यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. आगामी अधिवेशनात या महामंडळाची घोषणा करण्यात यावी, अशी मागणीही म्हस्के यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे लाऊन धरली. या मागणीवर सकारात्मकपणे विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. चर्चेदरम्यान मुख्यमंत्री यांनी केले व्हॉईस ऑफ मीडियाच्या कामाचे जोरदार कौतुक केले. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड या चर्चेदरम्यान उपस्थित होते. त्यांनीही पत्रकारांच्या या मागणीला समर्थन देत पत्रकारांच्या कल्याणासाठी महामंडळाची गरज विषद केली. यावेळी छत्रपती संभाजी मालिकेतील येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रायक्ता गायकवाड, यासह ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांना वाऱ्यावर सोडणार नाही : शिंदे

निवेदन स्वीकारल्यानंतर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील पत्रकारांना वाऱ्यावर सोडणाार नाही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्यामुळे हा आधारस्तंभ मजबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील शाासन पूर्ण सहकार्य करेल. पत्रकारांच्या वेदना असह्य आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’त्याला वाचा फोडण्याचे काम करीत आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’मुळे भविष्यात पत्रकार व पत्रकारिता यांची दशा व दिशा सुधारल्याशिवाय राहणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

म्हस्के यांनी दिले मुख्यमंत्री यांना आभाराचेही पत्र

राज्यातील डिजिटल, ईलेक्ट्रानिक्स आणि रेडिओ माध्यमातील पत्रकारांना श्रमिक दर्जा प्रदान केल्याबद्दल आणि पत्रकार सेवानिवृत्ती नंतरचे वाढीव मानधन मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करणारे पत्रही व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी मुख्यमंत्री यांना दिले. दीड वर्ष व्हॉईस ऑफ मीडिया ने या दोन्ही विषयासाठी आंदोलन पुकारात प्रचंड पाठपुरावा केला होता.

फोटो ओळ – व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अनिल म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रथम आगमनप्रसंगी राष्ट्रपतींचा शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार

Fri Jul 7 , 2023
– “संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य” : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु   – स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य : राज्यपाल – द्रौपदी मुर्मु शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तित्व : एकनाथ शिंदे – राष्ट्रपती मुर्मु यांची आदिम जनजातींप्रती संवेदना स्पृहणीय : देवेंद्र फडणवीस मुंबई :-समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!