नगरपंचायतच्या कामावर लक्ष आहे तरी कुणाचे ? 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामावरनगरपंचायतचे अभीयंतेच नाही.

करोडो रुपये खर्च , मग देखरेख कुणाची.

पारशिवनी – पारशिवनी शहरातील नगरपंचायत अंतर्गत सध्या करोडो रुपयाचे काम सुरू आहे . या कामावर नगरपंचायतच्या कोणत्याही अभीयंत्यांचे तसेच नगरपंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे मत डाॅ. इरफान अहमद यांनी व्यक्त केले.

गेल्या पाच वर्षाआधी पारशिवनी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला. नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर येथे सार्वत्रीक निवडणुका झाल्या.व त्या पार देखील पडल्या. व पारशिवनी नगरपंचायतला नवा मुख्याधिकारीही मिळाला. पण गेल्या तीन वर्षापासुन नगर विकास मंत्रालयाकडुन मोठ्या प्रमाणात पारशिवनी शहराला विकास निधी मिळाला. या सर्व कामाची पहाणी केली असता , कोणतेही काम हे उत्कृष्ट दर्ज्याचे झाले नसल्याचे डाॅ.  इरफान अहमद यांनी सांगीतले. याकडे स्थानीक प्रशासन व लोकप्रतिनीधी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे जनमानसात चर्चा आहे.

पारशिवनीचा मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचा नगरपंचायतचा कालावधी संपलेला असुन , कुणाच्या  आशीर्वादाने त्या आजही येथे कार्यरत आहेत. त्यांचा याच कार्यकाळात पारशिवनी शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड देत समोर जावे लागले. सध्या पारशिवनी तहसील ते मुख्या बाजार पेठ या सिमेंट रस्त्याचा कडेला होत असलेल्या सिमेंटीकरणाचे असत्तरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात निकृष्ठ दर्ज्याचे होत असुन , या कामात सिमेंटची मात्रा कमी होत असुन व्हायब्रेटर रोलर लावणे आवश्यक होते. मात्र संबंधित कंत्राटदार हा साधा रोलर लाऊन काम करीत आहे. याबाबत सामाजीक कार्यकर्ते डाॅ. इरफान अहमद यांनी नगरपंचायतचे अभीयंता सौरभ कावळे यांना विचारले असता, हेकेखोरीच्या भाषेत बोलत मला जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी मंगळवार व शुक्रवार हे दिवस पारशिवनीकरीता दिलेले आहे. असे सांगीतले. पण जेव्हा त्यांना भ्रमणध्वनीद्वारे विचारले , तेव्हा या कामावर अभियंता सौरभ कावळे उपस्थीत तर नव्हतेच . पण त्यांचे तांत्रीक कर्मचारी , कंत्राटदार व नगरपंचायतचे कोणतेही कर्मचारी या कामावर उपस्थीत नव्हते .इतके होऊन सुद्धा नगरपंचायतचा मुख्याधिकारी अर्चना वंजारी दुर्लक्ष करीत आहे. हे एक शोकांतीकाच असल्याचे मत सर्वसामान्य जनता विचारत आहे.

काम करोडोचे , पण लक्ष कुणाचे 

सध्या पारशिवनी तहसील कार्यालय ते मुख्य बाजारपेठ दरम्यान मुख्य सिमेंट काॅक्रीटच्या दोन्ही बाजुला सिमेंट काॅक्रीटच्या अस्तरीकरणाचे काम अंदाजीत 1 करोड 70 लक्ष रुपयाचे मंजुर आहे. या कामावर एक क्युबीक मिटर करीता साडे चार बॅग सिमेंटचा वापर करणे आवश्यक आहे. पण दोन क्युबीक मीटर करता फक्त सहा बॅग सिमेंट वापरण्यात येत आहे. या कामात व्हायब्रेटर रोलरचा वापर कुठेही होत नसल्याचे सध्या दिसुन येत आहे. असे निकृष्ठ दर्ज्याचे काम सध्या पारशिवनी नगरपंचायत मध्ये होत असुन , शहरवासीयांमध्ये कमालीचे नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.

” पारशिवनी नगरपंचायत अंतर्गत होत असलेले कामे हे निकृष्ट दर्ज्याचे होत असुन , याकडे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे कुठेही लक्ष नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही अभीयंत्यावर व कर्मचाऱ्यांवर त्यांची वरदहस्त नाही. हेही तितकेच खरे ! या दुर्लक्षीत कामाकरीता पारशिवनी शहरवासी लवकरच आंदोलनाचा पावित्रा उचलणार आहे. “ डाॅ. इरफान अहमद  सामाजिक कार्यकर्ता बार्शी

” शहराचा विकासाला चालना मिळावी , याकरीता नेहमी शहरवासी तत्पर असतात . मात्र अश्या निकृष्ट दर्ज्यांचा कामामुळे पारशिवनी शहराचे नाव लयास येत आहे. याकडे स्थानीक लोकप्रतीनीधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ”   मो.अफरोज खान पुर्व महासचिव , रामटेक लोकसभा युवक काॅग्रेस

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त २८ मे रोजी पर्यटन विभागाच्या पुढाकारातून पदयात्रा

Fri May 26 , 2023
मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चा समारोप मुंबई :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन २१ ते २८ मे २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी दि. २८ मे रोजी दादर, मुंबई येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com