नागपूर :- संघर्ष नगर येथील आलोका ट्रस्टच्या वतीने संचालित संघाराम महाविहारात नुकताच वर्षावास समाप्ती, भोजनदान व संघदानाचा कार्यक्रम पार पडला.
सकाळी इंदोरा चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भन्ते धम्मसेवक महास्थवीर, विनयरखीता महास्थविर, खेमधमो महास्थवीर, ग्यानबोधी महास्थवीर, ज्ञानरक्षित महास्थविर ह्यांनी माल्यार्पण केल्यावर धम्म रैलीची सुरुवात करण्यात आली.
कामठी रोड ने पीडब्ल्यूएस कॉलेज, कांशीराम टी पॉईंट, महिंद्र नगर, यादव नगर, एकता कॉलनी येथून फिरत फिरत संघर्ष नगरातील संघाराम येथे समारोप झाला. या ठिकाणी महाउपासिका रोशनी सिद्धार्थ गायकवाड यांच्या वतीने भोजनदान व संघदानाचा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी प्रामुख्याने सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ गायकवाड, माजी पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक गौतम पाटील, बसपा नेते उत्तम शेवडे, डॉ. मिलिंद पखाले, रंजीत फुले, शैलेश खडसे, सुमित खातरकर, अमोल नगरारे, विवेक सोनुले, पवन खोब्रागडे, सुशील देशभ्रतार, विजय इंगळे आदींची या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भन्ते ज्ञानबोधी होते