नागपूर :-दक्षिण नागपुरच्या चंद्रमणी नगरातील बुद्ध विहारात डॉक्टर आंबेडकर सेमिनरीचे मुख्य संचालक भंते धम्मसारथी यांच्या धम्मदेसनेने वर्षावास समापनाचा समारोह संपन्न झाला. बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष नागोराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोहात प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते उत्तम शेवडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी नगरातील महिलांच्या वतीने उपस्थित असलेले भंते धम्म सारथी, भंते प्रज्ञावंश, भन्ते राहुल, भन्ते परंपरा, भन्ते आशिष यांना धम्मदान दिले. तसेच सुमित्रा बुरबुरे ह्या महिलेने विहाराला पाच खुर्च्यां दान दिल्या.
याप्रसंगी भन्ते धम्मसारथी यांनी वर्षावासाचे महत्त्व व वर्षावास मागील तथागताची संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. उत्तम शेवडे यांनी बुद्धाने वैशालीच्या वज्जी ह्यांच्या बाबत दिलेली माहिती व कालामांना दिलेला कालाम सुतातील संदेश अमलात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम आयोजन समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेवडे, जय भीम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष विनोद धनविजय व चंद्रमणी नगर बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष नागोराव जयकर यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने संघमित्रा वानखेडे, प्रमोद गावंडे, अजय ढगे, प्रदीप ढोबळे, मधुकर लिंगायत, मोहन वाळके, माया कांबळे, चंदा कांबळे, सुनीता डंबारे, अहिल्या नंदेश्वर, चंद्रकला कांबळे, सुमन नारायणे, कांता जयकर, मनोहर नंदेश्वर, सतीश थूलकर, मनोज मेश्राम, शैलेश वाकडे, ईश्वर कोमलकर, चंदा गायकवाड, अशोक गवळी आदि प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामूहिक भोजनाने वर्षावास समापन झाले.