नागपूर : हिवाळी अधिवेशन कालावधीत सुयोग पत्रकार निवासस्थानी सेवा देणाऱ्या कर्मचारी बांधवांचा हृद्य सत्कार माध्यम प्रतिनिधींतर्फे आज करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार, शाखा अभियंता राजेंद्र बारई, शेखर पाटील, शिबिरप्रमुख विवेक भावसार, महेश पवार आदी उपस्थित होते.
सुयोग येथील कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले. सुयोग येथील भोजन कक्षात सेवा देणाऱ्या आचारी, वाढपी, सफाई कर्मचारी, तसेच वाहनचालक, दवाखान्यात सेवा देणारे डॉक्टर, परिचर आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
‘सुयोग’ येथे कर्मचाऱ्यांचा सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com