लसीकरण आणि चाचण्यांवर भर द्या : महापौर दयाशंकर तिवारी

कोरोनाच्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा

नागपूर, ता. ५ : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या या तिस-या लाटेपासून नागपूर शहरातील नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने लसीकरण आणि कोरोना चाचण्यांवर जास्तीत जास्त भर द्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

            कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटसह आलेल्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने महापौरांनी बुधवारी (ता.५) आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात यासंबंधी बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी आर.विमला, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, सुनील अग्रवाल, उपायुक्त रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अतुल राजकोंडावार, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलावार, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. सागर पांडे मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, नोडल अधिकारी घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

            कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेउन त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. स्थायी कोरोना चाचणी केंद्रांसह मनपाकडे असलेल्या २५ मोबाईल चाचणी केंद्र आहेत. मात्र संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी जास्त चाचण्या होणे आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मांडले. मोबाईल चाचणी केंद्रांची संख्या वाढवून ती ७५ करण्यात यावी. तसेच पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टिमची संख्या वाढविण्यात यावी. या टिममध्ये शहरात कोरोनाच्या मागील लाटेमध्ये मनपाच्या सहकार्यासाठी पुढे आलेल्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. शहरात मनपाच्या केंद्रांसह मेडिकल आणि मेयो येथील केंद्रांवर चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुढाकार घेण्यात आला असून लवकरच शहरात दररोज १५ ते १६ हजार कोरोना चाचण्या करण्यात येतील, अशी माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. चाचणीसाठी सध्या ‘सेल्फ टेस्टींग किट’ औषध दुकानांमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. याकडे विशेषत्वाने लक्ष देउन जी व्यक्ती ही किट खरेदी करतो त्याची सविस्तर माहिती घेउन त्याचा अहवाल औधषी दुकानदाराकडे सादर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी जिल्हाधिकारी आर.विमला यांना दिले.

जीवन सुरक्षित करण्यासाठी दूसरा डोज घ्या

नागपूर शहरात लसीकरणासाठी १९ लाख ७३ हजार नागरिक पात्र होते. यापैकी या सर्वांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. यानंतर आता शहरात कामानिमित्त, शिक्षणासाठी येणा-यांना पहिला डोस देणे सुरू आहे. मात्र शहरातील अडीच लाखांवर व्यक्तींनी अजूनही लसीकरणाचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. लसीकरण हे कोरोनापासून बचावाचे उत्तम शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी लस घ्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे. दुसरा डोस न घेणा-या व्यक्तींची यादी काढून ती केन्द्रनिहाय सादर करण्यात यावी. स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने दुसरा डोज घेण्यास पात्र असलेल्यांचे लसीकरण करण्यात यावे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने या लसीकरणाला गती मिळेल, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला.

            १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरणाला सुद्धा गती देण्याचे त्यांनी निर्देशित केले. मनपाच्या स्थायी लसीकरण केंद्रांसह शाळा, महाविद्यालयांमध्येही मनपाद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. लवकरच या वयोगटातील सर्वांचे दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र या वयोगटातील जे मुले शाळा अथवा महाविद्यालयात नाही त्यांना शोधण्यात अडचण येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. अशा मुलांचा शोध घेउन त्यांचे लसीकरण करण्यासाठी स्थानिक स्तरावर नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

बाहेर फिरणा-या पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती द्या

            कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही अनेक रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येतात. ओमिक्रॉनच्या संसर्गाची गती ही सर्वाधिक असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांनी बाहेर फिरणे इतरांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. नागरिकांच्या परिसरात असलेले पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत मनपाच्या नियंत्रण कक्षाला (0712-2567021) महिती द्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

शहरात ७ हजारावर कोव्हिड बेड्स

            यावेळी महापौरांनी नागपूर शहरातील शासकीय, मनपा आणि खासगी रुग्णालयांमधील कोव्हिड बेड्सचा आढावा घेतला. नागपूर शहरात शासकीय आणि मनपाचे ३००३ आणि खासगीचे ४३५५ असे सर्व मिळून एकूण ७३५८ बेड्स कोव्हिड साठी असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. या बेड्स पैकी शासकीय व मनपा रुग्णालयांमध्ये ४८२ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १६४३ बेड्स आयसीयूचे आहेत. शासकीय व मनपा रुग्णालयांमध्ये ९९३ ऑक्सिजन बेड्स आहेत. तर खासगी रुग्णालयांमध्ये २४०७ बेड्स ऑक्सिजनचे असल्याची माहिती रुग्णालयांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या माध्यमाने डॅशबोर्ड तयार करुन नागरिकांना रुग्णालयात रिक्त बेड्सची माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

शासकीय व मनपाचे बेड्स

हॉस्पीटल एकूण बेड्स कोव्हिड बेड्स मनपाकडे राखिव बेड्स आयसीयू बेड्स ऑक्सिजन बेड्स सामान्य बेड्स
व्हेंटिलेटर नॉन व्हेंटिलेटर एकूण
मेडिकल १९०० ९०० ४५० ७७ ७८ १५५ २९५
मेयो ८२४ ५९८ २९९ ५१ १७ ६८ २३१
विभागीय रेल्वे हॉस्पीटल १८५ ८९ ८९ १८ २२ ६७
एम्स १२५६ १२५६ ६२८ २२१ २२१ ३०६ १००
इंदिरा गांधी रुग्णालय ११० ११० ११० १६ ९४
नागपूर विद्यापीठ कोव्हिड हॉस्पीटल ५० ५० ५० २० ३०
एकूण ४३२५ ३००३ १६२६ ३८० १५२ ४८२ ९९३ १००

खासगी हॉस्पीटल्समधील बेड्स

एकूण मंजूर बेड्स चालुस्थितीत उपलब्ध बेड्स कोव्हिड बेड्स ऑक्सिजन आयसीयू ऑक्सिजन विरहित व्हेंटिलेटर्स
६४०८ ५५२७ ४३५५ २४०७ १६४३ ३०१ ३५५

 

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महापौर स्वररत्न स्पर्धेत श्याम बापटे, अक्रम खान, ग्रंथिक खोब्रागडे विजेते - महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Wed Jan 5 , 2022
नागपूर, ता. ५ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महापौर स्वररत्न गायन स्पर्धेमध्ये श्याम बापटे, अक्रम खान आणि ग्रंथिक खोब्रागडे हे अनुक्रमे ४१ वर्षावरील, १८ ते ४० वर्ष आणि ७ ते १७ वर्ष या वयोगटातील विजेते ठरले. महापौर स्वररत्न स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी (ता.४) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!