संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रा प हद्दीतील राज रॉयल लॉन च्या मागे असलेल्या आलम नगर येथील कच्च्या शेड मध्ये बांधून असलेल्या 11 बकऱ्या अज्ञात आरोपीने चारचाकी वाहनात टाकून चोरून नेल्याची घटना गतमध्यरात्री 3 दरम्यान घडली असून या घटनेने बकरी पालकाचे जवळपास 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले यासंदर्भात पीडित फिर्यादी विंदाबाई निर्मलकर वय 48 वर्षे रा आलम नगर कामठी ने पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी महिला यांनी आपल्या ताब्यात असलेल्या पाळीव बकऱ्यांना घरातील कच्च्या शेड मध्ये बांधून ठेवून झोपी गेले असता अज्ञात चोरट्याने अज्ञात चारचाकी वाहनाने शेड मध्ये बांधून असलेल्या पांढऱ्या रंगाचे चार बकरे,2 काळ्या पांढऱ्या रंगाची बकरी,2 लाल रंगाची बकरी,2 पांढरे रंगाचे बकरे असे एकूण 50 हजार रुपये किंमतीचे पाळीव बकरे गतमधरात्री 3 वाजता चोरून नेल्याची घटना सकाळी निदर्शनास येताच गावात चर्चेचा विषय ठरला.पोलिसांनी यासंदर्भात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.