नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोन अंतर्गत संघर्षनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून शुक्रवारी (ता.१८) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या हस्ते हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.
यावेळी संघर्ष नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी कुंभारे, डॉ.प्रीती चोपकर, सुनील आगरे, राम सामंत, जीएनम खुशाली उमाठे, रश्मी हलमारे, एएनएम वैशाली मेश्राम, शैफाली श्यामकुवर, गीता सोनवणे, उर्मिला तिरपुडे, प्रियंका लोहारे, एलटी मीनाक्षी पोराटे, एचएलएल मेघा राऊत, कैलाश कांबळे, इंदू मोटघरे, आशा सेविका गायत्री उचितकर, शारदा चोपकर, मनीषा चामट, सत्यभामा मेश्राम, रश्मी निकोडे, वैशाली धरगावे, ज्योती गजभिये, पल्लवी मेश्राम, ज्योती मेश्राम, प्रीती तलमले, विधाता रामटेके, ईश्वरी बोरकर, मीनाक्षी उंबरकर, सुषमा वैद्य, दयावती रामटेके, माया उरकुडे, संगीता तांगडे, शुभांगी सरांगपुरे, आरती कानोजे, जीवनकला ढोके, सुनील आगरे, मेडप्रो हॉस्पिटल येथील नर्सिंगच्या विद्यार्थीनी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागरिकांना मनपा कर्मचा-यांच्या समक्ष गोळ्या सेवन करण्याचे आवाहन केले. हत्तीरोग हा आजार औषधाने पूर्णत: बरा होतो. या आजारापासून नागरिकांनी दूर रहावे यासाठी शासनामार्फत प्रतिबंधात्मक औषधोपचार केले जातात. हत्तीरोग हा आजार शरीराचे विद्रुपीकरण करणारा आजार आहे. यापासून दूर राहण्यासाठी स्वच्छता राखणे, डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेणे आणि प्रतिबंधात्मक औषधांचे सेवन करणे आवश्यक आहे. शहरात १७ ते ३१ ऑगस्टपर्यंत हत्तीरोग दुरीकरण मोहिम राबविली जात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी भेट देउन हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप करणार आहेत. या गोळ्या नागरिकांनी सेवन करून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे देखील आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.