कामठी तालुक्यातील 9 ग्रामपंचायत उपसरपंचाची निवडणूक शांततेत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- 18 डिसेंबरला पार पडलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या थेट जनतेतून 27 सरपंच तसेच 93 प्रभागातून 247 सदस्यांची निवड करण्यात आली.यातील उपसरपंच पदाची निवडणूक ही तीन टप्प्यात होऊ घातली आहे त्यानुसार आज 6 जानेवारीला 9 ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवडणूक पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली.

उपसरपंच पदाची निवडणूक पार पडलेल्या या 9 ग्रामपंचायत पैकी खैरी ग्रामपंचायत ची उपसरपंच पदाची अविरोध पार पडली ज्यामुळे उपसरपंच पदी रामदयाल ठाकरे ची निवड करण्यात आली.येरखेडा ग्रा प च्या उपसरपंच पदी मंदा प्रमोद महल्ले, रणाळा ग्रा प उपसरपंच पदी अंकिता तळेकर, बिना ग्रा प उपसरपंच पदी हरीश गजभिये, भिलगाव ग्रा प उपसरपंच पदी मनोज जिभकाटे,खसाळा ग्रा प उपसरपंच पदी अतुल बावनकुळे,सुरादेवी ग्रा प उपसरपंच पदी संदीप कोडापे ,खापा ग्रा प उपसरपंच पदी निजाम बराडे तर गुमथी ग्रा प उपसरपंच पदी रंजना मानवटकर निवडून आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या भजन संध्येत श्रोते तल्लीन, ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’चे उद्घाटन

Sat Jan 7 , 2023
नागपूर : ‘ऐसी लागी लगन…मीरा हो गयी मगन…’ हे सूर लक्ष्मीनगरच्या मैदानात घुमले आणि उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पद्मश्री भजन सम्राट अनुप यांचे स्वागत केले. श्री. सिद्धिविनायक ट्रस्ट झिल्पीद्वारे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’च्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.6) अनुप जलोटा यांच्या भजन संध्येत श्रोते तल्लीन झाले. तत्पूर्वी माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते एक्स्पोचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com