निवडणूक निरीक्षक यांनी घेतला प्रशिक्षणाचा आढावा.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 10;-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 58-कामठी विधानसभा मतदार संघाकरिता ईव्हीएम मशीन प्राप्त झाल्या असून सदर ईव्हीएम मशीनचे द्वितीय यावदच्छिकरण हे उमेदवार, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आज 10 नोव्हेंबर ला निवडणूक निरीक्षक सुनील कुमार,निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनार्थ पार पडले.यावेळी उपस्थित उमेदवारांना सदर प्रक्रिया समजवून सांगण्यात आली.तसेच मतदान केंद्राची यादी ,व्हीआयएस चे वेळापत्रक ,

मशीनची यादी इत्यादींच्या प्रति पुरविण्यात आल्या.

तसेच 14 व 15 नोव्हेंबर रोजी गृहमतदान होणार असून त्याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक यांनी दिले.यावेळी निवडणूक निरीक्षक सुनील कुमार यांनी दिल्ली पब्लिक स्कुल कामठी येथील प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन प्रशिक्षणास आलेल्या कर्मचारी यांचेशी संवाद साधला व त्यांना निवडणूक विषयी बारकावे समजून घेण्याचे निर्देश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ही फक्त पदयात्रा नाही... ,हा विश्वास आहे महायुतीवरचा, माझ्यावरचा...!- प्रवीण दटके यांचे प्रतिपादन 

Mon Nov 11 , 2024
नागपूर :- मध्य नागपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांच्या जनसंवाद यात्रेचा तांडपेठ येथून शुभारंभ झाला.यावेळी या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतला.तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सर्वांची विचारपूस केली,यावेळी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रभागात केलेल्या कामा बद्दल नागरिकांनी आभार मनात जागोजागी स्वागत केले. या पद यात्रेत आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, गिरीश देशमुख, दीपराज पार्डीकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com