संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र – आजनी – गुंमथळा मार्गावरील राणी तलाव मोक्षधामा परिसरात आज सकाळी 9 वाजता सुमारास मोठे झाड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प पडली होती नागरिकांना नवीन कामठी क्यानल मार्गाने तीन चार किलोमीटरचा फेरा करून आजीने मार्ग गाठावा लागल्याने नाकच त्रास सहन करावा लागला गेल्या पंधरा दिवसापासून कामठी तालुक्यात मुसळधार पर्वाचा चे थैमान सुरू असून आज पहाटे 4:00 वाजेपासून कामठी तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असताना सकाळी 9,30 वाजता सुमारास कामठी आजनी मार्गावरील राणी तलाव मोक्षधाम पुढे मोठे झाड कोसळल्याने सकाळी साडेनऊ वाजेपासून चार तास वाहतूक ठप्प पडली होती मोठे झाड कोसळले त्या दरम्यान कोनीही नागरिक, वाहन त्या झाडाखाली न आल्याने सुदैवाने प्राणहानी टळली दोन्ही मार्गाने येणाऱ्या नागरिकांना नवीन कामठी कॅनल मार्गे कामठीत येणे जाणे करावे लागले त्यादरम्यान काही नागरिकांनी कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांना झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प पडले असल्याची माहिती दिली त्यांनी नगर परिषदेचे कर्मचारी पाठवून झाड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली या मार्गाने या मार्गाच्या दोन्ही बाजूने मोठे मोठे झाड असून जुने झाडे असल्यामुळे केव्हाही झाडे कोसळून मोठ्या घटनेची शक्यता नाकारता येत नाही तरी या मार्गावर असलेले जुने झाड साफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.