अमरदिप बडगे प्रतिनिधी
भंडारा :- तुमसर तालुक्यातील “फडापेन पेनठाना समिती लिंगोगड”(गायमुख) च्या वतीने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा” यांच्या जयंती चा कार्यक्रम दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ ला आयोजित केला आहे.
क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातील उलिहातु या गावी झाला.क्रांतिसूर्य बिरसा बिरसा मुंडा यांनी “जल -जंगल-जमीन”चा नारा देत आदिवासी सामाजिक /सांस्कृतिक व्यवस्था वाचविण्यासाठी इंग्रजविरोधात चळवळ उभी केली. या चळवळीत बिरसा मुंडा यांना अनेक जाती धर्मातील लोकांनी मदत केली. मुंडांनी या लोकांच्या मदतीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. या महान क्रांतिवीरचा मृत्यू रांची शहराच्या कारागृहात ९ जून १९०० मध्ये वयाच्या २५ वर्षी संशयास्पद अवस्थेत झाला.
या महान भारतीय क्रांतिसूर्याची जयंती ” फडापेन पेनठाना समिती लिंगोगड गायमुखचे अध्यक्ष विकास सुदाम मरस्कोल्हे व सभासद- भिवाकर नागोराव वरकडे यांच्या पुढाकाराने आयोजीत केला आहे.
कार्यक्रमाला प्रभा पेंदाम माजी प.स.सदस्य, अशोक उईके माजी जि. प.सदस्य, प्रकाश मडावी, मदनदयाल चांदेवार, ग्यानीराम भलावी, शरद उईके, लीलाधर चांदेवार,रवी सोयाम, राजकुमार इनवाते,मंगेश वरकडे,बाबूलचंद उईके, राम मर्सकोल्हे,संजय धुर्वे,विणाराम टेकाम संजय मडावी, रोहित उईके, अनिकेत वरकडे, दिवीत वरकडे, मानव वरकडे, मितेश वरकडे, नरेंद्र मडावी, नागेश कळपाते, सोनू उईके, योगेश पेंदाम, राहुल पेंदाम उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ “फडापेन पेनठाना समिती लिंगोगड” येथे उपस्थित राहून घेण्याचे आव्हान अध्यक्ष विकास मरस्कोल्हे, भिवाकर वरकडे यांनी केले आहे.