संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जूनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैन्य विभागाच्या काटेकोर सुरक्षित असलेल्या कँटोन्मेंट परिसरात बंगला नं 10 येथे बंगल्यात एकट्या झोपी असलेल्या वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला करून जबरी दरोडा घालण्याची घटना मध्यरात्री दीड दरम्यान घडली असून जख्मि महिलेचे नाव अमेंदर अजित बेदी वय 66 वर्षे रा कँटोंमेंट एरिया कामठी असे आहे तर या बंगल्यातुन आरोपीने नगदी 25 हजार रुपये,गळ्यातील सोन्याची व चांदीची चैन तसेच एक सॅमसंग कँपनिचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली असून जख्मि महिला आशा हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. बातमी लिहिस्तोवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता हे इथंविशेष!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी छावणी परिषद परिसर हा सैन्य विभागाच्या आटोक्यात येत असून सदर परिसर हा संवेदनशील असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षितता असते .या परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश करण्यासाठी काटेकोर चौकशी करूनच प्रवेश दिला जातो तसेच शिस्तीचे नियम सांगण्यात येतात मात्र येथील दरोडेखोराने या सर्व सुरक्षिततेला तोंड देत या संवेदनशील परिसरात बिनधास्त पणे प्रवेश करून सदर बंगल्याच्या मागील खिडकीतून अवैधरित्या प्रवेश केला असता बंगल्यात एकटीच गाढ झोपेत असलेल्या वृद्ध महिलेने दार उघडला असता आरोपीने घरात ठेवलेली प्रेस सदर महिलेच्या डोक्यावर मारून रक्तबंबाळ केले व तिच्या गळ्यातील सोन्या चांदीचे चैन व नगदी 25 हजार रुपये घेऊन पसार झाला.इतक्या संवेदनशील व सैन्य विभागाच्या सुरक्षिततेत या प्रकारची घटना होणे हे येथील सैन्य विभागाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहे.उल्लेखनीय आहे की मागील काही वर्षांपूर्वी या परिसरात खून होण्याची घटना सुद्धा घडली आहे.
मध्यरात्री सदर घटनास्थळी झालेल्या प्राणघातक हल्ला तसेच जबरी दरोडा च्या घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी करीत तपासाला गती दिली आहे तसेच या प्रकरणात फोरेन्सिक पथक सुद्धा पाचारण करण्यात आले.बातमी लिहिस्तोवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता…