नागपूर : सीना कोळेगाव प्रकल्पातील बऱ्याच खातेधारकांनी नियमानुसार ६५ टक्के रक्कम भरली नाही. त्यामुळे आता या खातेधारकांना ही रक्कम भरण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास तयार झालेला सध्याचा आराखडा विस्कळीत होईल, त्यामुळे राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी एक सर्वंकष विस्तृत धोरण ठरवून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
सीना कोळेगाव प्रकल्पासंदर्भात विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना जमिनी खरेदी करून गावठाणास द्यावी लागल्यास ती देण्यात येईल. त्याचबरोबर जमिनीचे वाटप करताना सर्व प्रकल्पग्रस्तांची एकत्रित बैठक घेऊन एकाच कुटुंबातील सदस्यांना जवळपास जमिन, प्लॉट देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तरादरम्यान सांगितले.
या लक्षवेधीत विधान परिषद सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही प्रश्न विचारला होता.