‘ईट राईट इनिशिएटिव्ह’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा – धर्मरावबाबा आत्राम

– अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी मोहीम

नागपूर :-  अन्न पदार्थांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच राज्यातील जनतेमध्ये अन्न सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी ‘ईट राईट इनिशिएटिव्ह’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. तसेच, अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी विभाग कटीबद्ध असून त्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

रविभवन येथे मंत्री आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर व अमरावती विभागाची आढावा बैठक पार पडली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे, औषधे विभागाचे सहआयुक्त व.तु.पवनीकर, सहआयुक्त (अन्न) ए.पी. देशपांडे यांच्यासह विभागातील अन्न व औषधे सहायक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरिक्षक उपस्थित होते.

राज्यातील अन्न सुरक्षा कार्यप्रणाली बळकट करण्याकरिता राज्य व केंद्र शासनामध्ये झालेल्या करारानुसार राज्यात वर्ष 2023-24 दरम्यान ‘ईट राईट इनिशिएटिव्ह’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत क्लीन स्ट्रीट फुड हब, क्लीन अँड फ्रेश फुड अँड व्हेजीटेबल मार्केट, ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, हायजिन रेटिंग, फोस्टॅक ट्रेनिंग आदीचा समावेश आहे. या माध्यमातून अन्न पदार्थांची गुणवत्ता वाढीसह जनतेमध्ये अन्न सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आत्राम यांनी या बैठकीत दिले. यासाठी उद्दिष्टांचा इष्टांक देण्यात आला असून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.

भेसळमुक्त अन्न व औषध मोहीमेसाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अडचणी व मागण्या समजून घेतल्या. अभिमन्यु काळे यांनी अधिकाऱ्यांना विविध विषयांवर सूचना केल्या. व.तु.पवनीकर यांनी सादरीकरण केले.

बैठकीनंतर मंत्री आत्राम यांनी अन्न व औषध विभगातर्फे नागपूर व अमरावती विभागातील औषध विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीवर अपीलाची सुनावणी घेतली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बनावटी अवैद्य मद्य वाहतुकीवर पोलीसांची धडक कारवाई; एकुण 36,86000/-रू चा मुद्देमाल  जप्त..

Sat Aug 12 , 2023
नागपूर – बनावटी अवैधरीत्या देशी दारू बाळगून वाहतूक करून चंद्रपूर ते नागपूर विक्रीस जाण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून बनावटी अवैधरीत्या देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या मद्य साठा व वाहन जप्त करून कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे  दि 11/8/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांचे पथक उपविभागात पेट्रोलिंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com