भंडारा :- जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिनस्त असलेल्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयामार्फत ग्रंथालय सदृष्य नि:शुल्क् अभ्यासिका /ग्रंथालय सुरु आहे.या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेविषयक पुस्तके उपलब्ध असुन या अभ्यासिकेचा जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक /युवती यांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा .
या अभ्यासिका जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शिवाजी स्टेडीयम भंडारा बस स्टॉप जवळ, येथे कार्यरत आहे. या अभ्यासिकेची वेळ कार्यालयीन दिवशी ( सुटटीचे दिवस वगळुन ) सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजे पर्यत राहील. सदर अभ्यासिकेचा जिल्हयातील जास्तीत जास्त युवक /युवतीनी लाभ घ्यावा.असे आवाहान सहायक आयुक्त, सु.रा.झळके, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यांनी कळविले आहे.अधिक माहीतीसाठी कार्यालयीन क्रं.07184-252252 व संपर्क साधावा.