पर्यावरणपूरक मूर्ती कार्यशाळा संपन्न!

– पीओपी मुर्तीमुळे पर्यावरणास धोका,

– वाडी नप.चा उपक्रम

वाडी(प्र):- वाडी येथील प्रगती विद्यालय येथे नगरपरिषद वाडी तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा 5.0 आयोजित पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भाविकांनी पी ओ पी च्या मूर्ती ची स्थापना करण्याऐवजी मातीपासून बनविलेल्या मूर्तींला प्राधान्याने पसंती देऊन पर्यावरण सुरक्षेसाठी सहकार्य करून आपण आपले सण इको फ्रेंडली साजरे करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून वाडी नगर परिषद तर्फे जनजागृती करण्यात येत आहे.

नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गोदरेज फाऊंडेशन चे व्यवस्थापक आदर्श तंवर व स्वच्छता ब्रॅण्ड एम्बेसिडर नरेशकुमार चव्हाण यांनी प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना माती पासून गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करून हातांनी मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी विध्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मातीचे गणपती बनविण्याची कला अवगत करण्याची तयारी दाखवली. तसेच मूर्ती विसर्जनाच्या दिवशी नगरपरिषद तर्फे तयार केलेल्या कृत्रिम टाक्या मध्येच किंवा शाळेमध्येच एका टॉप मध्ये विसर्जन करून त्या मातीत एक झाड लावण्याची माहिती देण्यात आली. कार्यशाळेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी पोजगे, सचिव अतुल देशमुख, प्रकाश आदे यांनी सहकार्य केले, फीडबॅक फाउंडेशनचे टीम प्रोजेक्ट मॅनेजर आदर्श तवर,पिंकी पाटील, जयश्री शिदुरकर आणि अर्चना गुल्हाने प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन

Mon Sep 9 , 2024
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत मुंबई :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांचे श्रीगणेशमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com