नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा-वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 1 :- दरवर्षी नववर्षाची चाहूल लागताच 31 डिसेंबरच्या मेजवाणीची चाहूल लागायला लागते आणि याच पाश्वरभुमीवर बहुतांश तरुणाई मंडळी पासून ते वयोवृद्धापर्यंत थिरकतात त्यात काही उत्साही मंडळी नववर्षाचे स्वागत उत्साहाच्या नादात मद्य प्राशन करतात ज्यामुळे नववर्षाचे स्वागत हे आपल्या शरीराला रोगराईचे निमंत्रण देऊन करतात ज्याचे भान उरत नाही तेव्हा नववर्षाचे स्वागत हे सर्वतोपरी सुखसंपन्न असायला पाहिजे या हेतूने साजरा करावा ना की व्यसनाचे सेवन करून स्वतःच्याच शरीराला रोगराईचे निमंत्रण द्यायचे कारण व्यसनाने उलट आरोग्यास धोका निर्माण होतो तर दूध हे पौष्टिक असून शरीर बळकट व आरोग्यास हितकारक आहे तेव्हा एक अभिनव उपक्रम म्हणून नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत गतरात्री 31 डिसेंबर ला जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने नागरिकांना दूध वितरण करून नागरिकांना ‘नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा’ ..असे आवाहन नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी केले असून सर्वांना नूतनवर्षाभिनंदन केले.

याप्रसंगी एपीआय राजेश गडवे, एपीआय राजेंद्र गुबे, एपीआय ठाकूर,पोलीस उपनिरीक्षक केरबा उर्फ आकाश माकने,महिला पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे,पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ राखुंडे, पोलीस कर्मचारी किशोर मालोकर,सूचित गजभिये, शैलेश यादव,दिलीप ढगे, धर्मेंद्र राऊत, श्रीकांत विष्णुरकर,अंकुश गजभिये,इशांत कांबळे,अरविंद आळे, ज्योती शहारे,शहणाज अन्सारी,माया अमृ,संगीता लांजेवार, सुनीता मेश्राम, दुर्गा भगत,रुपाली साकोरे,मनीषा ढोके,सुदर्शना लांजेवार आदी उपस्थित होते

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com