कृषी तज्ज्ञ, मंडळ कृषी अधिकारी , कृषी सहाय्यक यांनी बोरी , काचुर्वाही , मसला येथे
दिली भेट
शेतकऱ्यांन सोबत केली चर्चा
रामटेक – मिरची हे पिक रामटेक तालुक्यातिल एक महत्वाचे नगदी पिक असून मागील 10 ते 15 दिवसाचा प्रतिकूल हवामान परिस्तिथीमुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असून त्यामुळे मिरची पिकावरील चुरडा-मुरडा या विषाणूजन्य रोगाची लागण झालेली आहे,
त्यामुळे मिरची पिकात 40 ते 50 टक्क्याने घट होऊन नुकसान होऊ शकते. ही माहिती ,जिल्हा परिषद सदस्य,
दुधराम सव्वालाखे यांना कळताच त्यांनी डॉ. नंदकिशोर लवे (कीटक शास्त्रज्ञ कृषी महाविद्यालय नागपुर), दिनेश भिन (तालुका कृषी अधिकारी रामटेक), चंद्रमनी हाटे (मंडळ कृषी अधिकारी रामटेक), नारायण तोडमल (कृषी सहाय्यक) यांना आपले सोबत घेऊन *मसला, बोरी, काचुरवाही* येथे स्वतः शेतकऱ्यांसोबत शेतात जाऊन मिरची पिकावरील रोगाची पाहणी केली…
यावेळी डॉ. रामसिंग सहारे , जयवेंद्र कंगाली, गजानन चकोले, प्रदीप चकोले, नरेश बर्वे, शुभम कामडे, गजानन भलमे व गावातील मिरची उत्पादक शेतकरी उपस्थित होते…