डीआरआयने गुप्त माहिती च्या आधारे मुंबई विमानतळावर सिएरा लिओन देशाच्या नागरिकांकडून 20 कोटी रुपयांचे कोकेन केले जप्त

मुंबई :- नैरोबीहून मुंबईला आलेल्या आणि सिएरा लिओनचे नागरिकत्व असणाऱ्या एका महिला प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DR)I अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर, रविवार 24 मार्च 2024 रोजी ताब्यात घेतले. या महिला प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता ती नेत असलेल्या वस्तू उदा. बुट, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली आणि अँटी-पर्स्पिरंट्स हे विलक्षण जड होते. महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीत या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या शिताफीने लपवलेली पांढरी पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटचा वापर करून या पदार्थाची चाचणी केल्यावर त्यात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.

एकूण 1979 ग्रॅम पांढऱ्या पावडरच्या रुपातील जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे बाजार मूल्य अंदाजे 19.79 कोटी आहे. यावेळी या महिला प्रवाशाने आपला जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली.त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने भारतातील मादक द्रव्यांच्या धोक्याशी लढा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पूनरुच्चार केला तसेच, प्रतिबंधित अमली पदार्थ लपविण्याची नवीन पद्धत शोधून पुन्हा उच्च व्यावसायिक मानके स्थापन करण्यात रस दाखवला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेतनपट आकडेवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत जानेवारी 2024 या महिन्यात 16.02 लाख सदस्यांची वाढ

Tue Mar 26 , 2024
– जानेवारी महिन्यात 8.08 लाख नव्या सदस्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी नवी दिल्ली :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ मधील सदस्यांची तात्पुरती वेतन पट आकडेवारी आज म्हणजेच 24 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली. जानेवारी 2024 मध्ये, ईपीएफओ मध्ये 16.02 लाख सदस्य झाल्याचे, या आकडेवारीत अधोरेखित करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात, सुमारे 8.08 लाख नव्या सदस्यांची नोंदणी झाली असल्याचेही या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com