नागपूर :- नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत डॉ. सुनील लहाने यांची अकोला महानगरपालिकेचे आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. सुनील लहाने यांचे अभिनंदन केले.
आयुक्त कक्षामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. लहाने यांचा मनपाचा मानाचा दुपट्टा आणि तुळशीरोप देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना निरोप दिला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, कार्यकारी अभियंता लीना उपाध्ये, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.