जीवनाचा आधार म्हणजे डॉक्टर – डॉ संजय माने

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आपला दवाखाना हे लोकांच्या उपचारासाठी कार्यरत असून याचा फायदा हा शेतमजूर,शेतकरी व आजारी रुग्ण ते बाळंतपण होणाऱ्या महिलेपर्यंत पोहोचत असते .मनुष्य आजारी पडतो, त्याला जगण्याची इच्छा असते अशावेळी रुग्णांना डॉक्टरच जगवू शकतो त्यामुळे जीवनाचा आधार म्हणजे डॉक्टर असल्याचे मत माजी तालुका आरोग्य अधिकारी संजय माने यांनी व्यक्त केले.भूगाव येथील तालुका आरोग्य केंद्र येथे आयोजित माजी तालुका तालुका अधिकारी डॉ संजय माने यांच्या बदलीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.

तसेच पुढे बोलताना डॉ संजय माने म्हणाले की ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देताना अनेक अडचणींना डॉक्टरांना सामोरे जावे लागतेव.रुग्णांना सेवा देतेवेळी त्यांना रुग्णांना वैद्यकीय समज कमी असते व गरज नसताना ही इंजेक्शन व स्लाईनची रुग्ण अपेक्षा करीत असतात. रुग्णांना शेवटपर्यंत वाचविण्याचे प्रयत्न डॉक्टर करीत असतानाही कधीकाळी डॉक्टरांना नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याची खंत सुद्धा बोलून दाखविली.

दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी सांगितले की तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी फुलकर यांची बदली झाल्यानंतर जुलै 2020 मध्ये कामठी तालुका आरोग्य अधिकारी पदावर डॉ संजय माने यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक रखडलेल्या प्रकरणाचा निपटारा केला. त्याचंदरम्यान कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाला.या काळात त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कोरोनाशी दोन हात करीत जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली.ऑक्सिजन कॉंनसनट्रेटरसह कोविड केअर सेंटर उभारणीसाठी महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. लसीकरणात मोलाची भूमिका बजावली.डॉ संजय माने हे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आधार असल्याचे मत व्यक्त केले.

या निरोप समारंभ कार्यक्रमाला नव्याने रुजू झालेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय चिलकर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी,आरोग्य सहाय्यक धिरेंद्र सोमकुवर,कृष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर येळे,लेखापाल कामेश्वर सिलेकर,सचीन राखडे,चंदा माकडे,तसेच सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तरुणाई गुरफटतेय ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यात!

Fri Aug 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असून यासाठी इंटरनेट ही आवश्यक बाब झाली आहे.प्रत्येक व्यवहार ऑनलाईन केला जात असल्याने व्यवहारात पारदर्शकता यावी म्हणून प्रत्येक बाबीना इंटरनेट शी सांगड घातली जात आहे. आजतागत या जगातील कोणतीही गोष्ट म्हटली तर त्यांचे गुण अवगुण हे असतातच तशीच बाब आता इंटरनेटच्या बाबतीतही पडून येत असल्यामुळे आजची तरुणाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!