नागपूर : देशाच्या वैभवात भर घालणारा महत्वाचा प्रकल्प म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर होय. या प्रकल्पाची सुरुवात 15 सप्टेंबर 2015 पासून सुरुवात झालेली असून आता हा प्रकल्प पुर्णत्वास येत आहे. येत्या 14 एप्रिलला लोकार्पण करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे काम 15 मार्चपर्यंत पूर्ण करुन देण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मधील अधिकाऱ्यांना दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर या प्रकल्पाचा बांधकामा संदर्भात आढावा घेण्यासाठी तसेच सदर प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पाची सखोल पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे उपस्थित होत्या.
नागपूर आणि राज्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रकल्पात पार्किंग व लिफ्टची व्यवस्था आहे, लोअर तळ मजला, तळमजला- यात 400 लोकांची क्षमता असलेला बॅक्वेंट हॉल किचन व पॅन्ट्रीसह, डायनिंग हॉल, बिझनेस सेंटर आणि रीसेप्शन, दोन कॉन्फरन्स हॉल प्रति हॉल 100 लोकांची क्षमता, मिडीया सेंटर हॉल, बँक आहे. प्रथम मजला यात रेस्टॉरेंट, फाऊंडेशन ऑफिस आहे. दुसरा मजला – यात पब्लिक ई-लायब्ररी 200 ची क्षमता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 40 फुट उंचीचा ब्रांझ पुतळा, तिसरा मजला – यात बुद्धिस्ट स्टडीज डिव्हीजन, रीसर्च सेंटर, चौथा मजला – ऑडिटोरीअम 700 ची क्षमता, व्हिवर्स गॅलरी म्युझिअम व आर्ट गॅलरी, व्ही.आय.पी. गेस्ट रूम, पाचवा मजला ऑडिटोरीअम बाल्कनी, व्ही.आय.पी गेस्ट रूम, ट्रेनिंग हॉल व प्रतीक्षालय इत्यादी कामे समाविष्ट केलेली आहेत. अधिक चांगल्या पद्धतीने करणेबाबत निर्देश दिलेले असून या प्रकल्पाच्या बांधकामावर डॉ.सिध्दार्थ गायकवाड हे लक्ष देत आहेत.
या प्रकल्पासाठी 131.68 इतक्या निधीस मंजूरी असून रु.113.74 कोटी खर्च झालेला असून रु.14.94 कोटीच्या वाढीव खर्चास दि.14.11.2022 च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सदर निधी लवकरच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना वळती करण्यात येईल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 40 फुट उंचीचा ब्रांझ पुतळा करीता रु.3.00 कोटी वाढीव खर्चास लवकरच मान्यता मिळेल, असेही यावेळी डॉ. गायकवाड, यांनी सांगितले. सदर प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झालेले असून लवकरच उर्वरीत कामे पूर्ण होतील असे नागपूर महानगर विकास प्राधिकरण येथील उपस्थित अधिकाऱ्यंनी सांगितले. या प्रसंगी भाजीपाले, अधिक्षक अभियंता, नागपूर सुधार प्रन्यास चिमुरकर, कार्यकारी अभियंता, संदिप कांबळे, वास्तुशास्त्रज्ञ व बालपांडे, कार्यकारी अभियंता इ. उपस्थित होते.
@ फाईल फोटो