ड्रॅगन पॅलेस परिसरात ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’’ 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार उदघाटन

 माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचा उपक्रम  

कामठी ता प्र 2 – धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर 2022 रोजी ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृातिक व संशोधन केन्द्र येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारीत ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’’ मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन 4 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या् हस्ते होणार आहे. यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी मंत्री सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती सांगणारे सचित्र छायाचित्र, तसेच डिजीटल वॉल, एलएडी टिव्हीवर चलचित्र स्वरूपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहिती पट ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर भारत सरकारच्या पब्लिकेशन डिव्हीजनद्वारे पुस्तकांचे प्रदर्शनही राहणार आहे. आरोग्य विभाग, कामठी मार्फत नागरीकांसाठी लसिकरण शिबिर राहणार आहे. सदर प्रदर्शन 4 ते 6 अक्टूबर, 2022 पर्यन्त सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहणार आहे. ही प्रदर्शनी नागरिकांसाठी नि:शुल्क राहणार आहे. सदर प्रदर्शनाला नागरीकांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनाचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर व ओगावा सोसायटी, कामठी यांच्याद्वारे प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण..

Mon Oct 3 , 2022
वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज ईमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज झाले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार  रामदास आंबटकर, रणजित कांबळे, डॅा.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, मुख्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com