डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून मानवी हक्क दिले – माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामठीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वॉकथॉन

कामठी :- विश्वभूषण ,बोधिसत्व ,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानी भारतीय संविधानातून देशातील नागरिकांना संविधानिक हक्क व अधिकार प्राप्त करून दिले .देशातील नागरिकांनी आपले जीवन संविधानिक पद्ध्तीने ज्ञापन करावे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचार ,संदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून मानवी हक्क दिले असल्याचे मौलिक प्रतिपादन माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा  कुंभारे यांनी कामठी येथील ऍड दादासाहेब कुंभारे परिसरात आयोजित वॉकथॉन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त बुशिंत दो कराटे असोसिएशन तर्फे कामठी शहरात ‘स्पोर्ट्स अँड कल्चरल विक’साजरा करण्यात येत आहे .त्यानुसार आज 21 एप्रिल ला सकाळी 6.30 वाजता कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे परिसरात ‘वॉकथॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत 30 ते 40 वर्षे वयोगटा पासून ते 70 ते 80 वर्षे वयोगटातील महिला पुरुषांनी सहभाग नोंदविला होता.यातील विजेत्याना प्रथम व द्वितीय व तृतीय पुरस्काराने निवड करण्यात आली.

या वॉकथॉन स्पर्धेचा शुभारंभ कर्मविर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे व स्वप्नील पातोळे,सेन्सई सचिन कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पन व अभिवादन करीत पंचशील झेंडी दाखवून करण्यात आला.याप्रसंगी स्पर्धेत सहभागी झालेले 30 वर्षे वयोगटातील महिला प्रथम म्हणून माधुरी उके,द्वितीय म्हणून नितु राऊत तर तृतोय म्हणून रोशनी टेंभरे विजयी झाले तसेच 40 वर्षे वयोगटात उज्वला राजकुमार चौरे(प्रथम)स्वर्ण नारणवरे(द्वितीय),स्मिता थोरात व अनिता गजभिये(तृतीय),50 वर्षे वयोगटात सुजाता बावंनगडे(प्रथम), ,रेखा मेश्राम(द्वितीय), नलिनी मेश्राम(तृतीय) 60 वर्षे वयोगटात सुशिला चव्हाण (प्रथम),व 70 वर्षे वयोगटात कमल कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

तर पुरुष वर्गात 40 वर्षे वयोगटात संजय भैसारे(प्रथम), राजकुमार चवरे (द्वितीय),मनोजभाऊ मेश्राम(तृतीय),50 वर्षे वयोगटात राष्ट्पाल गजभिये(प्रथम), शैलेश खोब्रागडे (द्वितीय) नितीन गजभिये,(तृतीय),60 वर्षे वयोगटात अनिल बेंदले (प्रथम)नरेंद्र खोब्रागडे(द्वितीय)तर प्रमोद टेंभुरने तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.तसेच 70 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांकाने सिनियर ज्युनियर विचार मंच चे अध्यक्ष दुर्वास सहारे विजयी झाले तर शिवचरन सहारे द्वितीय क्रमांकांने विजयी झाले तसेच 80 वर्षे वयोगटातील अनुपचंद कांबळे यांनी प्रथम स्थान प्राप्त करून विजयी झाले.

या सर्व विजयी स्पर्धकांना पुज्यनिय भन्ते नागदीपंकर तसेच उपरोक्त नमूद उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी, बुशिन दो कराटे चे संजय चौरे,विद्या भीमटे,आशुतोष वासे,महेंद्र कापसे, प्रमोद खोब्रागडे, युवराज बोरकर,अविष चौरे,निशीत पोहरे,उदास बन्सोड,आदर्श मेंडपाले,धनश्री बागडे,गुंजन मेश्राम, प्रिन्स बरोडे, बबलू वासनिक, शैलेश खोब्रागडे, राजेश सुखदेवें,ब्रिजेश सिन्हा,आर्या सुखदेवें,मंगल सुरडकर आदीनी मोलाचे परिश्रम घेतले.संचालन किशोर भीमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय चौरे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजपूत क्षत्रिय ठाकूर समाजाचे 15 वे वधू-वर परिचय सम्मेलन 28 एप्रिल रोजी

Sun Apr 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राजपूत क्षत्रिय बहुउद्देशीय सेवा संघ, नागपूर यांच्याशी संलग्न राजपूत क्षत्रिय ठाकूर वैवाहिक मंडळ नागपूरच्या वतीने विवाहोत्सुक तरुण-तरुणींसाठी परिचय सम्मेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विगत 15 वर्षांपासून राजपूत ठाकूर वैवाहिक मंडळाच्या हा सम्मेलन साज़रा होत आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही मंडळाचे 15 वे परिचय सम्मेलन 28 एप्रिल रोजी गुरुदेव सेवाश्रम, गांधी सागर नागपूर येथे रामन सायन्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com