नागपूर :- भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात वैज्ञानिक ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ कार्यालयात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेश नाईक, मंगेश वैद्य, संजय वाकडे, मधुकर घुमे, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक समिधा लोहरे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.