डबलडेकर उड्डाणपूल नागपूरसाठी ठरणार वरदान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

– एलआयसी-ऑटोमोटिव्ह चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण

नागपूर :- नागपूरमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झालेला आहे. हे शहर हळूहळू बदलत आहे. त्यात आता एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौक या डबलडेकर उड्डाणपुलाची भर पडली आहे. हा उड्डाणपूल नागपूरकरांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले.

तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणाऱ्या एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या ५.६७ किमी लांबीच्या डबलडेकर उड्डाणपूलाचे लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी आमदार सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) त्यागी, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लानिंग) अनिलकुमार कोकाटे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

नागपूरची ओळख उड्डाणपुलांचे शहर अशी होत असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. ‘आशियात कुठेही नाही असा स्टेट ऑफ आर्ट उड्डाणपूल आपल्या शहरात निर्माण झाल्याचा मला अभिमान आहे. हा विक्रम करण्याचे भाग्य लाभले, याचा विशेष आनंद आहे. त्यासाठी नागपूरकर जनतेचेही अभिनंदन,’ असेही ना. गडकरी म्हणाले.

‘एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक डबलडेकर उड्डाणपुलामुळे नागपूर विमानतळ ते कामठी हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. वर्धा मार्गावरील डबलडेकर आणि पारडी चौकातील १२०० कोटींचा उड्डाणपूल यांनी नागपूरची शान वाढवली होती. आता त्याहून वेगळा आणि भव्य असा हा नवीन पूल नागपूरकरांच्या सेवेत आला आहे. या पुलाच्या निर्माणासाठी आलेल्या अडचणी दूर करण्याचे काम जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी केले. तर मेट्रोने अत्यंत अत्यंत कमी खर्चात पूल साकारला आहे,’ याचा ना. गडकरी यांनी आवर्जुन उल्लेख केला.

डबलडेकर उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्ये

– सर्वाधिक लांबीचा हा चारपदरी डबलडेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिअरवर उभा आहे

– प्रकल्पाची किंमत ५७३ कोटी आहे

– उड्डाणपुलांवर गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहेत

– गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ 1650 वजन क्षमतेचा स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे

– गड्डीगोदाम येथे खाली रस्ता, वर रेल्वेचा ट्रॅक, त्यावर पूल आणि त्याच्याही वर मेट्रो आहे

– या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठांच्या जीवनातील नकारात्मकता दूर व्हावी - ना. नितीन गडकरी

Sun Oct 6 , 2024
– ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे वार्षिक अधिवेशन नागपूर :- एकाकीपणामुळे ज्येष्ठांमध्ये नकारात्मकता निर्माण होते. आपण कुटुंबाला जड झालोय अशी भावना निर्माण होते. त्यांच्या मनातील ही भावना दूर व्हावी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यादृष्टीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. नितीन गडकरी यांनी (शनिवार) येथे केले. सक्करदरा येथील तेली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!