मा.आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त दात्यांचे रक्तदान

नितीन लिल्हारे, प्रतिनिधी

मोहाडी (सालई खुर्द) : सेवेत व्रत सातत्याने जपणारे विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकास फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदान केले. रक्ताची अत्यंत निकड असताना झालेले हे रक्तदान अनेकांचे प्राण वाचविण्यास हातभार लावणार आहे. रुग्णाला वेळीच रक्त मिळाले तर अनेकांचे जीव वाचते. या संल्पनेतून माजी आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने तुमसरच्या विकास फाउंडेशन कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर तुमसरचे युवा सभापती नंदू रहांगडाले यांनी संबोधित केले. प्रचंड दूरदृष्टी आणि अशक्यही शक्य करू अडचणींवर मात करणारे चरण वाघमारे हे आज सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आहेत. लोकांसाठी सदैव झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाला वाढदिवस व रक्तदानच्या माध्यमातून शुभेच्छा देताना आनंद होत असल्याचे सांगून या सेवा वृत्तीला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतो असे सभापती नंदू रहांगडाले म्हणाले.

सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे रक्तदान शिबिर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात आलेल्या प्रत्येक राक्तदात्याला माजी आमदार चरण वाघमारे यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र आणि रोपटे देऊन कौतुक करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या दात्याला लाईफ लाईन ब्लड बँक कडून टी शर्ट, जुश, बिस्कीट देण्यात आले. जवळपास 50 हुन अधिक दात्यांनी रक्तदान करून या वाढदिवसाला हजेरी लावली.

आज रक्ताची प्रचंड गरज आहे त्यामुळे आपली दिलेले दान व्यर्थ जाणार नाही, अनेकांचे जीव वाचविण्यासाठी परिणामकारक ठरेल असेही चरण वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष संदीप ताले, जि. प. सभापती बालू सेलोकर, उपसभापती हिरालाल नागपुरे, जि. प.सदस्या दुरपता मेहर, प.स.सदस्य सलोनी भोंडे, अविनाश उपरिकर, उमेश बघेले, मेहताबसिंग ठाकूर, अनिल जिभकाटे,गौरव नावरखेले, अजय बडवाईक, अश्विनी ठाकुर,परमानंद कटरे, पंकज राठोड, उपसभापती बबलू मलेवार, जि. प.सदस्य उमेश पाटिल, विकास फाउंडेशन तालुका अध्यक्ष हंसराज आगाशे, हरीचंद्र बधाटे माजी सभापती, महेश कळंबे, चंदू पिल्लारे, प.स.सदस्य जगदीश शेंडे, विश्वनाथ कुकडे, प्रकाश खराबे, राजेश लेंडे, शामु ईशवरकर, किशोर भैरम, आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षणाचे खाजगीकरण एक षडयंत्र!

Sun Jan 8 , 2023
संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी आजचे युग कलियुग नसून कलमयुग आहे-पुष्पांजली भगत टाकळघाट येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती महाप्रज्ञा बुद्ध विहार,पंचशील बुद्ध विहार व अशोका बुद्ध विहाराचा संयुक्त उपक्रम नागपूर/०८ जाणे :- सध्याघडीला देशातील राजकारणी आपल्या सोयीचे राजकारण करीत असून त्यांना हवा तसा इतिहास हा समाजात पेरत आहे.उर्फी जावेद,कपडे, खानपान यासारख्या बाबीवर देशातील जनतेचे जनतेचे लक्षकेंद्रित करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com