अमरदिप बडगे, प्रतिनिधी
मागील २९ वर्षा पासून सुरु आहे परंपरा
गोंदिया – शहरात मागील २९ वर्षा पासून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजन करत असलेल्या दिवसी काली पूजा केली जाते, हि काली पूजा बंगाली लोक करत असुन दिवसाळीच्या दिवसी कालीमातेच्या दिवीचे प्राणप्रतिष्टान केले जाते. तेही रात्री १२ वाजे पासून सुरु होत असुन सकाळी पहाटे पर्यंत हे पूजा सुरु असते. तसेच कालीमातेचे देवीची स्थापना दिवाळीच्या दिवसाची केली जात असुन पाच दिवस देवी विराजमान होते व पाचव्या दिवशी काली मातेला विसर्जन केले जाते. हि परंपरा मागील २९ वर्षा पासून सुरू असुन गोंदिया शहरात काही बंगाली लोक असल्याने हि परंपरा सतत सुरु आहे. त्याच प्रमाणे या पाच दिवसात देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भक्त काली मातेच्या दर्शना ला येत असतात.