नागपूर :- विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात दिलेले निवेदन, टोकन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त उत्तराची प्रतीसह उपस्थित राहावे, असे तहसिलदार महेश सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.