नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनात जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकूण निपटारा करण्यात येणार आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. लोकशाही दिनात जनतेच्या तक्रारी व निवेदन स्विकारण्याकरिता निकषांसह जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन, विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अपर आयुक्त राजलक्ष्मी शहा यांनी केले आहे. विभागीय लोकशाही दिनात निवेदन देण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1.00 असेल.