भंडारा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक, कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद शिला स्मारक उभारणीत अग्रेसर असलेले प्रेरणास्त्रोत श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने मंगळवार, 9 जुलै रोजी अभाविपच्या जुन्या तसेच विद्यमान कार्यकर्त्यांचे जिल्हा संमेलन स्प्रिंग डेल स्कूल, खात रोड, कृष्णनगरी, भंडारा येथे सायंकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून आयोजित या संमेलनाला अभाविप विदर्भचे पूर्व प्रांत मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर प्रमुख वक्ता म्हणून तर विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समिती भंडारा व अभाविप भंडारा जिल्हा यांनी केले आहे.